Bihar | तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय आरजेडी नेता आलोक कुमार यांच्यावर ईडीची कारवाई, तब्बल 17 ठिकाणी छापे....

बिहार सरकारमधील माजी मंत्री आणि राजद नेते आलोक कुमार मेहता यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 10 Jan 2025
  • 10:16 am
ED,RJD leader Alok Kumar,

संग्रहित छायाचित्र....

RJD leader Alok Kumar Mehta : बिहार सरकारमधील माजी मंत्री आणि राजद नेते आलोक कुमार मेहता यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला आहे. तसेच कर्ज घेतल्याच्या प्रकरणात ईडीने हा छापा टाकल्याचे समोर आलं आहे. जवळपास 17  ठिकाणी ईडीचे छापेमारी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण वैशाली सहकारी बँकेच्या कर्जाशी संबंधित आहे. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारासंदर्भात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कागदपत्रांची तपासणी करण्यात व्यस्त आहे. तसेच बँक कर्जाशी संबंधित या प्रकरणात, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची देखील चौकशी सुरू आहे.

जाणून घ्या, कुठे सुरू आहेत छापेमारी...

माजी मंत्री आलोक कुमार मेहता यांच्या 19 वेगवेगळ्या ठिकाणी ईडी छापे टाकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे पथक पाटणा आणि हाजीपूरमधील 9, कोलकातामधील 5, वाराणसीमधील 4 आणि दिल्लीतील 1 ठिकाणी छापे टाकत आहे. ईडीने त्यांच्या पाटणा येथील अधिकृत आणि खाजगी निवासस्थानावरही छापा टाकला आहे. वैशाली अर्बन डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँकेतील 85 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. आरबीआयच्या अहवालानंतर, हाजीपूरमध्ये या प्रकरणात 3 एफआयआर दाखल करण्यात आले होते.

आलोक मेहता हे उजीयारपूर मतदारसंघाचे आमदार... 

आलोक मेहता हे तेजस्वी यादव यांचे खूप जवळचे मानले जातात. बिहारमधील महाआघाडी सरकारच्या काळात आलोक मेहता हे महसूल आणि जमीन सुधारणा विभागाचे मंत्री होते. आरजेडीमधील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आलोक मेहता यांचीही भूमिका महत्वपूर्ण असायची. आलोक मेहता हे समस्तीपूरच्या उजियारपूर मतदारसंघाचे आमदार आहेत.

Share this story

Latest