संग्रहित छायाचित्र
हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२५ नुकताच जाहीर झाला आहे. व्हिसाशिवाय संबंधित देशाचे पासपोर्टधारक किती देशांना भेटी देवू शकतात यावरून हेन्ली पासपोर्ट इंडेक्स काढून त्यानुसार क्रमवारी जाहीर केली जाते. शक्तीशाली पासपोर्टच्या क्रमवारीत यंदा भारताच्या पासपोर्टची ५ अंकांनी घसरण झाली आहे. भारताचा क्रमांक हा ८० वरून ८५ व्या क्रमांकावर गेली आहे. भारतीय पासपोर्ट असणारे लोक ५७ देशांना व्हिसाशिवाय भेट देवू शकतात हे समोर आले आहे.
ज्या देशाच्या पासपोर्टधारकाला व्हिसा शिवाय सगळ्यात जास्त देशांमध्ये प्रवेश मिळतो त्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली असल्याचे मानले जाते. ११९ देशांच्या पासपोर्टची तुलना करून हेन्ली पासपोर्ट इंडेक्स काढला जातो.
कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली?
सर्वात जास्त शक्तिशाली पासपोर्ट हा सिंगापूरचा असल्याचे समोर आले आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्सच्या क्रमवारीत सिंगापूरला प्रथम स्थान मिळाले आहे. सिंगापूरचा पासपोर्ट असलेली व्यक्ती जगभरातील १९५ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकते. सिंगापूरच्या पाठोपाठ जपान (१९३ देश), फिनलँड (१९२ देश), फ्रान्स (१९२ देश), जर्मनी (१९२ देश), इटली (१९२ देश), दक्षिण कोरिया (१९२ देश), स्पेन (१९२ देश), ऑस्ट्रिया (१९२ देश) आणि डेन्मार्क (१९१ देश) या देशांचा क्रमांक लागतो.
कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात कमकुवत?
हेन्ली पासपोर्ट इंडेक्सच्या आकडेवारीनुसार पाकिस्तान आणि येमेन या देशांचे पासपोर्ट असणारे नागरिक केवळ ३३ देशांमध्ये विना व्हिसा प्रवेश करू शकतात. त्याखालोखाल इराक (३१ देश), सीरिया (२७ देश) आणि अफगाणिस्तान (२६ देश) यांचा क्रमांक लागतो.