संग्रहित
सावित्रीबाई फुलेंच्या चरित्र ग्रंथातील फातिमा शेख हे पात्र इतिहासात कधीच नव्हतं, असा खळबळजनक दावा केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं देशात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिलीप मंडल यांनी 2019-2020 मध्ये काही लेख लिहले होते, त्यामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख केला गेला होता. सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्यासोबतच फातिमा शेख यांचंही काम होतं, आणि फातिमा शेख यांनी शाळा चालवण्यामध्ये सहकार्य केलं असा उल्लेख त्यांच्याकडून वारंवार केला गेला होता. त्यावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान, हाच मुद्दा नव्याने समोर आणत दिलीप मंडल यांनी धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. फातिम शेख हे मी तयार केलेलं पात्र होतं. सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्या लिखाणामध्ये किंवा जीवनामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख कुठेही नाही. त्यांच्याविषयी जे जीवनचरित्र लिहलं गेलं त्यामध्येही फातिमा शेख यांचा उल्लेख नाही.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिला रेगे यांनी महाराष्ट्रामध्ये यावरती पुर्वी काम केलेलं आहे. त्यांच्या लिखाणामध्ये अभ्यासामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख आहे. त्यामुळे आता दिलीप मंडल यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
दिलीप मंडल यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
फ़ातिमा शेख के टीचर होने का कोई प्रमाण नहीं है। न था, न है। वह कोई हज़ार साल पहले की बात तो है नहीं।
— Dilip Mandal (@Profdilipmandal) January 9, 2025
डेढ़ सौ साल पहले इतनी महान महिला, वह भी मुस्लिम समाज में, जिनकी साक्षरता आज भी भारत में सबसे कम है, अगर वह होती तो सर सैय्यद अहमद से ज़्यादा उनके बारे में लिखा गया होता। https://t.co/y0fJtwLuPt
कोण आहेत दिलीप मंडल?
दिलीप मंडल हे अनेक वर्षे माध्यमांमध्ये होते. ते प्राध्यापक आहेत. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केलं आहे. पुस्तके लिहली आहेत. विशेषत: त्यांनी संघावर, भाजपवरती आणि हिंदुत्वावरती अनेकदा कठोर टीका केलेली आहे. दिलीप मंडल यांची माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारपदी ऑगस्ट 2024 मध्ये नेमणूक झाली होती. दिलीप मंडल यांनी त्यांच्या लिखाणाच्या संदर्भावरून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.