tirupati balaji mandir
आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. या घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
तिरुपती विष्णू निवासम या निवासी परिसरात बुधवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे तर, 40 अधिक भाविक जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवित्र वैकुंठ एकादशी निमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी टोकन मिळावे म्हणून गर्दी केली होते. गुरुवारी सकाळी 5 वाजल्यापासून 9 काऊंटर्सवर टोकन वाटप करण्यात येणार होते. तर शहरामध्ये आठ ठिकाणी टोकन वितरण केंद्र उभारण्यात आलं होते. मात्र, टोकण वाटपापूर्वीच भाविकांनी गर्दी केली. यावेळी चेंगराचेंगरी झाली.
#WATCH | Andhra Pradesh: Four people died in a stampede that occurred at Vishnu Nivasam in Tirupati during the distribution of Vaikunta Dwara Sarva Darshan tokens.
— ANI (@ANI) January 8, 2025
CM N Chandrababu Naidu spoke to officials over the phone about the treatment being provided to the injured in the… pic.twitter.com/655uJ7NEiK