PM Modi First Podcast : "चुका माझ्याकडूनही होतात, मी देव.."; पंतप्रधान मोदींच्या पहिल्या पॉडकास्टचा ट्रेलर समोर.....

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व बनले आहेत.सामान्य लोकांशी जोडता यावे यासाठी ते त्यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा लोकांशी संपर्क साधण्यासाठी एक नवीन पद्धत अवलंबली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 10 Jan 2025
  • 07:37 am
PM Modi Podcast,

People with The Prime Minister Narendra Modi

PM Modi First Podcast | पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व बनले आहेत.सामान्य लोकांशी जोडता यावे यासाठी ते त्यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा लोकांशी संपर्क साधण्यासाठी एक नवीन पद्धत अवलंबली आहे. खरंतर, पंतप्रधान ((PM Modi Podcast) भारतीय उद्योगपती निखिल कामथ यांच्या 'पीपल बाय डब्ल्यूटीएफ' या पॉडकास्ट शोमध्ये दिसले आहेत.

निखिल कामथ  (Nikhil Kamath) यांनी पंतप्रधान मोदींसोबत पॉडकास्ट केला आहे. हा पूर्ण व्हिडिओ रिलीज करण्यापूर्वी, निखिल कामथ यांनी सध्या ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये निखिल पंतप्रधानांना अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनीसुध्दा या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्यासोबत केलेल्या पॉडकास्टची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, हा त्यांचा पहिलाच पॉडकास्ट आहे. ज्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर उघडपणे भाष्य केलं. पंतप्रधानांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याची एक झलक शेअर केली. या ट्रेलरचे नाव 'पीपल विथ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी'  (People with The Prime Minister Shri Narendra Modi) असे ठेवण्यात आले आहे.

पॉडकास्टच्या 2 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये, निखिल कामत पंतप्रधानांना म्हणतात की, "तुमच्यासोबत बसून बोलत असताना मला चिंता वाटत आहे." यावर पंतप्रधान मोदी हसतात आणि म्हणतात, "पॉडकास्ट करण्याची माझी देखीव पहिलीच वेळ आहे, मला माहित नाही की ते कसे होईल. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल X वर निखिल कामथची पोस्ट पुन्हा पोस्ट केली आणि लिहिले, "मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हा पॉडकास्ट तितकाच आवडेल जितका आम्हाला तुमच्यासाठी तयार करताना आनंद झाला.

पॉडकास्ट मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी जगातील युद्ध परिस्थिती, राजकारणातील तरुणांचा प्रवेश, पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममधील फरक यावर मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी "चुका माझ्याकडूनही होतात, मी माणूस आहे, देव नाही", असंही म्हटलं आहे. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या या वक्तव्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. 

मीही एक माणूस आहे, देव नाही : पंतप्रधान मोदी

पॉडकास्ट दरम्यान,निखिल पंतप्रधान मोदींना विचारतात की, जर एखाद्या तरुणाला नेता व्हायचं असेल, तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या पारखल्या जाऊ शकतात? या प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान मोदी म्हणतात की, चांगले लोक राजकारणात येत राहिले पाहिजेत. असे लोक आले पाहिजेत, जे फक्त महत्त्वाकांक्षा घेऊन नाही, तर ध्येय घेऊन येतात. पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात की जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी भाषण दिलं. तेव्हा मी जाहीरपणे म्हटलं होतं की, 'चुका होतात.' माझ्या बाबतीतही असं घडतं. मी देखील एक माणूस आहे, देव थोडी आहे.

पॉडकास्टमध्ये, निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदींना जगात सुरू असलेल्या युद्धाबद्दलही प्रश्न विचारला. जगात काय चाललं आहे याची काळजी आपण करावी का? असा प्रश्न निखिलने पंतप्रधानांना विचारला. जगातील वाढत्या युद्धांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सातत्याने म्हणत आलो आहोत की आम्ही तटस्थ नाही आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, असं पंतप्रधान म्हणाले.

एकूणच निखील कामथ यांनी घेतलेल्या या मुलाखतीत हे सर्व प्रश्न विचारण्यात आले असून, याचा निवडक भाग सध्या ट्रेलर म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

कोण आहेत निखील कामथ?

निखिल कामथ हे एक भारतीय स्टॉक ब्रोकर आणि यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी २०१० मध्ये झेरोधाची स्थापना केली. झेरोधा स्टॉक, कमोडिटीज, म्युच्युअल फंड, बाँड आणि चलनांमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग सेवा देते. निखिलाने त्यांचा मोठा भाऊ नितीन कामथ याच्यासोबत झेरोधाची सुरूवात केली. झेरोधाचे १ कोटी क्लायंट आहेत, ज्यामुळे ते देशातील सर्वात मोठ्या ब्रोकरेज फर्मपैकी एक बनले आहे. ते रेनमॅटरचे संस्थापक देखील आहे. २०२४ च्या फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत निखिल यांचाही समावेश होता आणि फोर्ब्सनुसार, त्याची एकूण संपत्ती $३.१ अब्ज आहे. निखिल कामथ हे ट्रू बीकनचे सह-संस्थापक देखील आहेत, त्यांनी २०२० मध्ये ते सुरू केले. ट्रू बीकन ही एक मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे जी अति-उच्च-निव्वळ-वर्थ असलेल्या व्यक्तींना भारतीय बाजारपेठेत खाजगीरित्या गुंतवणूक करण्यास मदत करते.

मार्च २०२३ मध्ये, निखिलने 'पीपल बाय डब्ल्यूटीएफ' पॉडकास्ट सुरू केला. आतापर्यंत त्यांनी तन्मय भट, किरण मजुमदार-शॉ, सुनील शेट्टी, रितेश अग्रवाल, रॉनी स्क्रूवाला आणि इतर अनेक मोठ्या व्यक्तींसोबत पॉडकास्ट केले आहेत.

Share this story

Latest