ओळख बदलून केली तरुणीची फसवणूक
#उन्नाव
देशभरात 'लव्ह जिहाद'चा विषय चर्चेत असताना उत्तर प्रदेशातील एका उच्चशिक्षित युवतीने तिच्या फसवणुकीची कहाणी उघड केली आहे. एका युवकाने त्याची ओळख बदलून तिच्याशी प्रेमाचे नाटक केले. शारीरिक संबंधांनंतर तिला धर्मांतर करण्यासाठी भाग पाडल्याची व्यथा तिने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत मांडली आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नावमधील मोरवा येथे राहणारी एक मुलगी नोएडामधील एका कंपनीत काम करत होती. चार वर्षापूर्वी तिला उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यातील एका तरुणाने आपली ओळख बदलून प्रेमात फसवले. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून फोटो व व्हीडिओ रेकॉर्डिंग केला. तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून हळूहळू सहा लाख रुपये लंपास केले. तरुणीने त्याला लग्नाचे विचारल्यावर त्याने तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला. तो तरुणीला जीव मारण्याची धमकी देऊन लागला.
आपल्यावर प्रेम असल्याचे सांगणारा आणि विवाह करणारा युवक धर्मांतराचा आग्रह का धरतो आहे, याचे पीडित युवतीला आश्चर्य वाटले. मात्र आपली
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने संभल येथे जाऊन या युवकाची चौकशी केली. तेव्हा तिच्या लक्षात आले की, या तरुणाचे नाव अनुराग नसून जैद अली आहे. तो संभलच्या चंदौसी तालुक्यामधील बनियाठेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील नरौली गावाचा रहिवासी आहे. तरुणीने नरौली पोलीस चौकीत जाऊन या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. मंगळवारी (६ जून) रात्री उशिरा या मुलीच्या तक्रारीवरून बनियाठेर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध लवजिहादचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विरुद्ध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'लव्ह जिहाद'च्या मुद्यावरून
हिंदुत्ववादी आक्रमक
दरम्यान पीडितेची फसवणूक हा 'लव्ह जिहाद' असल्याचे सांगत स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि या गुन्ह्याची नोंद 'लव्ह जिहाद' प्रकरणाखाली करण्यात यावी, या मागणीसाठी शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले. पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पोलीस प्रशासनाच्याविरोधात मुख्यमंत्री कार्यालय आणि न्यायालयात दाद मागण्याची तयारी दाखवण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रदीप सिंह आणि बनियाठेर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जमावाला शांत करत आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.