विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही; राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्वाळा

लग्न झाल्यानंतर महिला किंवा पुरुषांनी स्वेच्छेने ठेवलेले विवाहबाह्य शरीरसंबंध (Extramarital affair) हा कायदेशीर गुन्हा नाही, असा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे.

Extramarital affair

विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही; राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्वाळा

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत याचिकाकर्त्यांचे म्हणणे फेटाळले

जयपूर : लग्न झाल्यानंतर महिला किंवा पुरुषांनी स्वेच्छेने ठेवलेले विवाहबाह्य शरीरसंबंध (Extramarital affair) हा कायदेशीर गुन्हा नाही, असा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती बीरेंद्र कुमार यांनी असे म्हटले आहे की, भारतीय दंड संहिता कलम ४९७ नुसार विवाहबाह्य संबंध व्यभिचाराचा गुन्हा या कक्षेत येत होते. मात्र २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवत ही बाब रद्द केली आहे.

विवाह झालेली व्यक्ती स्वेच्छेने विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर तो कुठलाही गुन्हा नाही. व्यभिचाराचा गुन्हा आधीच रद्द करण्यात आला आहे. एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे. राजस्थान उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. यामध्ये याचिकाकर्त्याने भारतीय दंड संहिता कलम ३६६ (अपहरण किंवा महिलेला लग्नासाठी भाग पाडणे) या प्रकरणावरची ही सुनावणी होती. माझ्या पत्नीला तीन जणांनी पळवून नेले असे याचिकाकर्त्याने म्हटले होते. याचिकाकर्ता या प्रकरणाच्या सुनावणीला उपस्थित राहू शकला नाही कारण तो तुरुंगात आहे. मात्र त्याची पत्नी न्यायालयात आली. तिने हे सांगितले की ज्याच्यावर आरोप लावला गेला आहे त्या आरोपीसह मी 'लिव्ह इन' रिलेशनशिपमध्ये राहते आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये दिलेले निर्णय तपासण्यात आले. सहमतीने विवाहबाह्य संबंध ठेवणे हे अपराध नाहीत हा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला.

याचिकाकर्त्यांचे वकील अंकित खंडेलवाल यांनी असा युक्तिवाद केला की, माझ्या अशिलाच्या पत्नीने हे मान्य केले आहे की, तिचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळे कलम ४९४ (पती किंवा पत्नी जिवंत असताना लग्न करणे) आणि कलम ४९७ (व्यभिचाराचा गुन्हा) या अन्वये कारवाई केली जावी. मात्र त्यावेळी न्यायालयाने हे स्पष्ट केले की, विवाहबाह्य संबंध हे व्यभिचाराच्या गुन्ह्याच्या कक्षेत येत नाहीत.

वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest