SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी; YONO, इंटरनेट बँकिंगसह 'या' सेवा उद्या करणार नाहीत काम!

जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी एक मोठे अपडेट आले आहे. SBI च्या YONO, नेट बँकिंग आणि मोबाईल ॲप सेवा उद्या काही काळासाठी बंद राहतील.

SBI

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी; YONO, इंटरनेट बँकिंगसह 'या' सेवा उद्या करणार नाहीत काम!

जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी एक मोठे अपडेट आले आहे. SBI च्या YONO, नेट बँकिंग आणि मोबाईल ॲप सेवा उद्या काही काळासाठी बंद राहतील. SBI ग्राहक 23 मार्च 2024 रोजी नियोजित शेड्यूल एक्टिविटीमुळे इंटरनेट बँकिंग सेवा वापरू शकणार नाहीत. तथापि, ग्राहक UPI Lite आणि ATM द्वारे सेवांचा वापर करू शकतात.

SBI ने आपल्या याबाबत नोटीफिकेश जाहिर केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, 23 मार्च 2024 रोजी दुपारी 01:10 ते  दुपारी 02:10 दरम्यान इंटरनेट संबंधित सेवा उपलब्ध नसतील. बँकेने सांगितले की, या काळात ग्राहक इंटरनेट बँकिंग, YONO Lite, YONO Business Web आणि Mobile App, YONO आणि UPI या सेवा वापरू शकणार नाहीत. मात्र, UPI Lite आणि ATM सेवा वापरता येतील.

कोणत्याही समस्येसाठी येथे संपर्क साधा

याकाळात एखादी अडचण आल्यास एसबीआय ग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांकाची मदत घेता येईल. ग्राहक कोणत्याही माहितीसाठी किंवा मदतीसाठी SBI टोल फ्री क्रमांक 1800 1234 आणि 1800 2100 वर कॉल करू शकतात. तसेच एसबीआयच्या अधीकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती मिळवू शकता.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest