कंगणा राणावत लढणार लोकसभा; भाजपाकडून उमेदवारी जाहीर

नुकतीच भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावत हिला हिमाचल प्रदेश मधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

नुकतीच भारतीय जनता पार्टीने (BJP) उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली.  या यादीत प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावत (Kangana Ranaut) हिला हिमाचल प्रदेश मधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच प्रसिद्ध रामायण मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल हे उत्तरप्रदेश मधील मेरठ मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे.  (Lok Sabha Election 2024)

उमेदवारी जाहीर झाल्यावर अभिनेत्री कंगणा राणावत हिने समाज माध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे. कंगणा राणावत म्हणते, भारतीय जनता पार्टीला मी नेहमी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. आज पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मला  माझं जन्मस्थान असलेल्या मंडी येथून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. हा माझा सन्मान असून यामुळे मला खूप आनंद झाला आहे. धन्यवाद. 

अभिनेत्री कंगणा राणावत ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना तिने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest