Steve Jobs’ wife attend Mahakumbh 2025 (File pic)
Steve Jobs’ wife attend Mahakumbh 2025 | महाकुंभाला कोणत्याही कारणाशिवाय श्रद्धा आणि संस्कृतींचा संगम म्हटले जात नाही. ही एक अशी घटना आहे जी युगानुयुगे घडत आहे आणि माणसाला माणसाशी जोडते. प्रयागराज येथे होणारा महाकुंभ-2025 हे याचे एक उत्तम उदाहरण असणार आहे.
महाकुंभ 13 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू होईल. या भव्य कार्यक्रमासाठी जगभरातून लाखो भक्त, संत आणि साधक येथे पोहोचतील. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमावर होणारा हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. या वर्षी महाकुंभात एक विशेष पाहुणी देखील सहभागी होणार आहे. ही पाहुणी म्हणजे स्टीव्ह जॉब्सची पत्नी आणि अब्जाधीश 'लॉरेन पॉवेल जॉब्स' होय. लॉरेन पॉवेल जॉब्स 'कल्पवास' परंपरेत सहभागी होतील.
लॉरेन पॉवेल जॉब्स ही अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी आहे. लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी उचललेले हे पाऊल अधिकाधिक परदेशी लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकते. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर ती 13 जानेवारी रोजी प्रयागराजला पोहोचेल. येथे पोहोचल्यानंतर ती निरंजनी आखाड्यातील महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या यांच्या शिबिरामध्ये राहणार आहेत. स्वामींनी त्यांना त्यांचे गोत्र दिले आहे आणि त्यांचे नाव 'कमला' ठेवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभ मध्ये लॉरेन जॉब्स कल्पवास देखील करणार आहेत. हिंदू धर्मामध्ये कुंभ आणि माघ महिन्यात साधुंसह गृहस्थांसाठी कल्पवासची परंपरा आहे. या काळात गृहस्थांना शिक्षण आणि दिक्षा दिली जाते. यासाठी काही नियम आणि धार्मिक मान्यता असतात. या काळात लॉरेन जॉब्स धार्मिक विधींमध्ये सहभागी होईल आणि पवित्र संगमात स्नान करेल. या पारंपारिक आणि आध्यात्मिक विधीत सहभागी होण्याचा लॉरेन पॉवेल जॉब्सचा निर्णय जगात महाकुंभाचे महत्त्व दर्शवितो.
स्वामी कैलाशानंद जी महाराजांनी दिली माहिती
स्वामी कैलाशानंद यांनी माध्यमांना सांगितले की, "लॉरेन जॉब्स यांच्या सहीत जगभरातील अनेक दिग्गज लोक कुंभमेळाव्यात सहभागी होणार आहेत. आम्ही या सगळ्यांचे स्वागत करणार आहे. लॉरेन जॉब्स या कुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी येत आहेत. यासह त्या आपल्या गुरुंनाही भेटणार आहेत. स्वामींनी त्यांना गोत्र दिले आहे, त्यांचे नाव कमला असं ठेवलं आहे."
दरम्यान, लॉरेन जॉब्स याआधीच्या महाकुंभ मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. त्या हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात. कुंभ व्यतिरिक्त, त्यांचे भारतात काही वैयक्तिक कार्यक्रम आहेत, यामध्ये त्या सहभागी होणार आहेत. लॉरेन पॉवेल जॉब्स, अब्जाधीश असण्यासोबतच, एक अतिशय दयाळू स्वभावाची महिला देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिला ही मालमत्ता तिचे पती स्टीव्ह जॉब्सकडून वारशाने मिळाली आहे. पॉवेल जॉब्स तिच्या सामाजिक कार्यासाठी जगात ओळखल्या जातात. त्यांनी इमर्सन कलेक्टिव्ह नावाची एक धर्मादाय संस्था स्थापन केली आहे जी शिक्षण, आर्थिक गतिशीलता, स्थलांतर आणि पर्यावरण यासारख्या मुद्द्यांवर काम करते.