Nana Patekar : मनिषामुळे विस्कटला नानाचा संसार!

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना कोणत्या वेगळ्या परिचयाची गरज नाही. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खास ओळख आहे. त्यांची शैली, त्यांचा आवाज तसेच त्यांची डायलॉग म्हणण्याची पद्धत अगदी प्रसिद्ध आहेत. नानांनी हिंदी व मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे.

Nana Patekar,Veteran actor ,film industry,recognition ,Hindi ,Marathi, movies

संग्रहित छायाचित्र

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना कोणत्या वेगळ्या परिचयाची गरज नाही. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खास ओळख आहे. त्यांची शैली, त्यांचा आवाज तसेच त्यांची डायलॉग म्हणण्याची पद्धत अगदी प्रसिद्ध आहेत. नानांनी हिंदी व मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे.  नानांच्या अभिनयासोबतच साधी राहणी, गावाची ओढ यासर्वांबद्दलच नेहमी चर्चा होताना दिसते.

पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मात्र फारसे कोणाला माहित नाही किंवा त्याबद्दल तेवढी चर्चा केली जात नाही. नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव आहे नीलकांती. पण ते दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही. घटस्फोट न घेता दोघेही वेगळे राहत आहेत.

नाना आणि नीलकांती यांना मल्हार हा मुलगा आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून नाना आणि नीलकांती वेगळे राहतात. या दोघांची पहिली भेट थिएटरमध्ये काम करताना झाली होती. नीलकांतीही ऐकेकाळी अभिनेत्री होत्या. थिएटर करत असताना त्यांची आणि नानांची भेट झाली. त्यावेळी नीलकांती बँकेत अधिकारी होत्या. प्रेमात पडल्यावर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या लग्नाचा खर्च अवघा ७५० रुपये झाला होता. अगदी साध्या पद्धतीने त्यांनी लग्न केले होते.  नीलकांती यांनाही अभिनयाची आवड होती. पण लग्नानंतर त्यांनी नोकरी चालू ठेवली. त्यांनी फक्त एकाच चित्रपटात काम केले होते. ‘आत्मविश्वास’ असे त्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता.

नीलकांती यांनी नाना पाटेकरांना अभिनयात करिअर करण्याठी पाठिंबा दिला. लग्नानंतर काही वर्षांनी नाना व नीलकांती आई-बाबा झाले. पण त्यांचा मोठा मुलगा अडीच वर्षांचा असताना त्याचे निधन झाले.  त्यानंतर त्यांना दुसरा मुलगा झाला, त्याचे नाव त्यांनी मल्हार ठेवले. मोठ्या मुलाच्या निधनाचा नाना पाटेकर यांना धक्का बसला होता. काही वर्षांनी पती-पत्नीमध्येही मतभेद सुरू झाले.

रिपोर्ट्सनुसार  काही वर्षांनी नाना पाटेकर यांचे नाव मनीषा कोईरालासोबत जोडले गेले. त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा येऊ लागल्या होत्या. त्यानंतर नीलकांती आणि नाना यांच्यातील दुरावा वाढतच गेला. इतक्या वर्षांनंतरही नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी घटस्फोट न घेता वेगळेच राहत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story