फिल्मी क्षेत्रातल्या महिला मैत्रिणी नसतात!

भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेल्या दिग्गज गायिका म्हणून आशा भोसले यांना ओळखले जाते. त्यांच्या सुमधूर आवाजाची जादू कायमच श्रोत्यांना भुरळ घालते. रसिकांना त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई चविष्ट जेवण बनवतात. दुबईमध्ये त्यांचे अनेक वर्षांपासून 'आशा'ज रेस्टॉरंट नावाचे हॉटेलही आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 23 Jul 2024
  • 03:29 pm
Asha Bhosale, film industry, 'Asha's Restaurant, Dubai, legendary singer, melodious voice

संग्रहित छायाचित्र

भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेल्या दिग्गज गायिका म्हणून आशा भोसले यांना ओळखले जाते. त्यांच्या सुमधूर आवाजाची जादू कायमच श्रोत्यांना भुरळ घालते. रसिकांना  त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई चविष्ट जेवण बनवतात. दुबईमध्ये त्यांचे अनेक वर्षांपासून 'आशा'ज रेस्टॉरंट नावाचे हॉटेलही आहे. अनेकदा आशा भोसले या हॉटेलच्या किचनमध्ये दम बिर्याणीसारखे विविध पदार्थ बनवत असतात. नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली. यावेळी त्यांना जेवणाच्या आवडीनिवडीशिवाय सिनेविश्वातील अनेक गोष्टींबद्दल भाष्य केले.

तुमच्या कोणी मैत्रिणी आहेत का,” असा प्रश्न आशा भोसले यांना विचारण्यात आला. यावर ज्येष्ठ गायिका म्हणाल्या की, माझ्या मैत्रिणी आहेत पण, त्या पुण्यात राहतात त्यांचा इंडस्ट्रीशी काहीच संबंध नाही. मला इंडस्ट्रीत मैत्रिणी बनवण्याची कधी संधीच मिळाली नाही. कारण, जास्तीत जास्त वेळ कामातच जायचा.  माझा सर्वाधिक वेळ कामात जायचा आणि तिथे माझ्या मैत्रिणी झाल्या नाहीत. फिल्म क्षेत्रातल्या महिला एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत.

 त्या एकमेकींवर जळतात त्यामुळे फिल्मी क्षेत्रात मैत्रिणी कशा बनवणार ?  पण, या सगळ्यात पूनम ढिल्लो माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. याशिवाय पद्मिनी कोल्हापुरे माझ्या जवळची आहे ती माझी भाची लागते. फिल्म क्षेत्रात या दोनच मैत्रिणी आहेत आणि या दोघी माझ्याबरोबर सगळीकडे असतात. मी कधी पार्टीही केली नाही. फक्त राज कपूर यांच्या १०-१२ पार्ट्यांना मी उपस्थित होते. त्यांच्या पार्ट्या मुंबईत सगळ्यात भव्य असायच्या, असेही आशा भोसले म्हणाल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story