तिचे स्थान महत्त्वाचे!

जीवनात ही घडी अशीच राहू दे…, बघता बघता दहा-वीस नव्हे तर ३५ वर्षे पूर्ण झाली. वयात १८ वर्षांचं अंतर, नाटकाच्या प्रयोगादरम्यान पहिली भेट, चित्रपटात भाऊ-बहीण म्हणून केलेले काम ते पडद्यामागच्या खऱ्या आयुष्यात साताजन्माचे जोडीदार! अशीच आहे निवेदिता व अशोक सराफ यांची सदाबहार प्रेमकहाणी…! घरातून विरोध, वयात अंतर, दोघांच्या प्रेमाला जवळच्या मित्राने दिलेली खंबीर साथ असे सगळे चढउतार या दोघांनी एकत्र पाहिले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 23 Jul 2024
  • 03:22 pm
Ashok Saraf, Nivedita Saraf, working as brother, rehearsal,  strong support, close friend

संग्रहित छायाचित्र

जीवनात ही घडी अशीच राहू दे…, बघता बघता दहा-वीस नव्हे तर ३५ वर्षे पूर्ण झाली. वयात १८ वर्षांचं अंतर, नाटकाच्या प्रयोगादरम्यान पहिली भेट, चित्रपटात भाऊ-बहीण म्हणून केलेले काम ते पडद्यामागच्या खऱ्या आयुष्यात साताजन्माचे जोडीदार! अशीच आहे निवेदिता व अशोक सराफ यांची सदाबहार प्रेमकहाणी…! घरातून विरोध, वयात अंतर, दोघांच्या प्रेमाला जवळच्या मित्राने दिलेली खंबीर साथ असे सगळे चढउतार या दोघांनी एकत्र पाहिले. पण, शेवटी ‘मामला पोरींचा’ या चित्रपटाच्या सेटवर जुळलेले यांच्या मनाचे बंध पुढे जाऊन लग्नाच्या रेशीमगाठीत अडकले.

‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटानंतर अशोक-निवेदिता यांनी ‘तू सौभाग्यवती हो’मध्ये काम केले.  पण, त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानसुद्धा या दोघांचे एकमेकांशी बोलणेही झाले नव्हते.  पुढे,  दोघांनी ‘मामला पोरींचा’ हा सिनेमा केला आणि तिकडेच त्यांचा हा मामला जमला. अशोक आणि निवेदिताच्या लव्ह स्टोरीमध्ये अभिनेत्रीला सर्वाधिक मदत सचिन पिळगांवकरांनी केली होती. ‘अशी ही बनवाबनवी’च्या सेटवर त्यांचे प्रेम खऱ्या अर्थाने फुलले. निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्यासमोर सर्वप्रथम आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. डेटिंग-अफेअर याच्यापुढे जाऊन लग्न करायचे हे त्यांनी ठामपणे ठरवले.

अशोक व निवेदिता यांचं लग्न गोव्यात पार पडलं. दोघांच्या वयात जवळपास १८ वर्षांचे अंतर होते.  अशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता या अवघ्या ६ वर्षांच्या होत्या. हे अंतर पाहता अभिनेत्रीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. चित्रपट क्षेत्रातील कोणत्याही मुलाशी निवेदिताने लग्न करू नये अशी तिच्या आईची इच्छा होती. पण, निवेदिता खूपच ठाम होत्या. यावेळी निवेदिताला मोठ्या बहिणीने म्हणजेच डॉ. मीनल परांजपे यांनी मदत केली होती. 

त्यांनी कुटुंबीयांचे मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. लग्नानंतर काही वर्षांनी निवेदिता यांनी कलाविश्वातून ब्रेक घेतला. आपला एकुलता एक मुलगा अनिकेत याचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी घरी राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही आई-वडील शूटिंगसाठी बाहेर असल्यावर मुलाकडे कोण लक्ष देणार याची काळजी अभिनेत्रीला होती. त्यामुळेच अनिकेतच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी निवेदिता यांनी गृहिणी म्हणून आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली असे असले तरीही अशोक सराफ यांना त्यांनी पदोपदी साथ दिली आहे. म्हणूनच अशोक सराफ या वाटचालीचे श्रेय निवेदिता यांनाच देतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story