वल्लरीचा डान्स पाहून राकेश घायाळ !

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. यामध्ये एजे आणि लीला ही दोन मुख्य पात्र अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी लोंढे साकारत आहेत. या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. लीलाने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांची मने जिंकली आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 22 Jul 2024
  • 04:03 pm
Nawari Mudhe Hitlerla, entertainment, zee marathi, aj and leela, rakesh bapat, vallari londhe, dance

संग्रहित छायाचित्र

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. यामध्ये एजे आणि लीला ही दोन मुख्य पात्र अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी लोंढे साकारत आहेत. या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. लीलाने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांची मने जिंकली आहेत. सध्या सोशल मीडियावर वल्लरीचा एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती ‘छला छलका रे’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. वल्लरीचा सहजसुंदर डान्स, अदा पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत. ‘लीलाला असे डान्स करताना पाहून एजेसुद्धा तिच्या प्रेमात पडेल’, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

राणी मुखर्जीवर चित्रित झालेल्या ‘छलका छलका रे’ या गाण्यावर वल्लरीने सुंदर डान्स केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने हा डान्सचा व्हीडीओ पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘तू इतकी सुंदर का आहेस’, अशी कमेंट अभिनेत्री हृता दुर्गुळेने केली आहे. तर ‘एक्स्प्रेशन क्वीन’ अशा शब्दांत एका यूजरने कौतुक केले आहे. ‘सहजसुंदर डान्स तुझ्या हावभावांमुळे आणखी छान वाटतोय’, असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. एका मुलाखतीत वल्लरीने तिच्या प्रोमोच्या शूटिंगदरम्यान घडलेला किस्सा सांगितला. ती म्हणाली, “माझी लीलाच्या भूमिकेसाठी निवड एकदम अनपेक्षित होती. मला फोन आला आणि दोन दिवसात तू ऑडिशनला ये असे सांगितले गेले.  मी जाऊन ऑडिशन दिली आणि तीन-चार दिवसात मला फोन आला की माझी निवड झाली आहे. माझा विश्वास बसत नव्हता की पहिल्याच ऑडिशनमध्ये माझी निवड झाली आहे. राकेश बापटसोबत माझी पहिली भेट एका लूक टेस्टसाठी झाली होती.

मला टेन्शन तर होतेच कारण लीलाचे खूप डायलॉग आहेत आणि त्यात राकेश बापट तुमच्यासमोर आहेत तर प्रेशर येणारच. कारण केमिस्ट्री मॅच झाली तरच लोकांना मालिका पाहायला आवडेल. पण त्यांना जेव्हा भेटले तेव्हा कळले की ते अतिशय साधे आहेत. आमचे लूक टेस्टही छान झाले.  लोकांचा प्रतिसाद खूप उत्तम मिळत आहे, म्हणून माझी उत्सुकता अजून वाढली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story