लग्न केव्हा करणार? श्रद्धा म्हणाली...

शक्ती कपूरची मुलगी ही ओळख मागे सोडत श्रद्धाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. यामुळे साहजिकच तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे. जेव्हापासून श्रद्धाने राहुल मोदीसोबतच्या नात्याची पुष्टी केली तेव्हापासून त्यांच्या लग्नाची चर्चा होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 20 Jul 2024
  • 05:10 pm
Shraddha Kapoor, Marriage, Stree 2

संग्रहित छायाचित्र

शक्ती कपूरची मुलगी ही ओळख मागे सोडत श्रद्धाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. यामुळे साहजिकच तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे. जेव्हापासून श्रद्धाने राहुल मोदीसोबतच्या नात्याची पुष्टी केली तेव्हापासून त्यांच्या लग्नाची चर्चा होत आहे. श्रद्धाला अनेकदा लग्नाबद्दल प्रश्न विचारले जाते. 'स्त्री २' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी जेव्हा अभिनेत्रीला लग्नाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने या चित्रपटातील डायलॉग ऐकवत लग्नाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान ग्लॅमरस मेकअप आणि सोनेरी-लाल साडीमध्ये श्रद्धा खूपच सुंदर दिसत होती. यादरम्यान लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या श्रद्धा भरभरून बोलली. ‘‘तू नववधूची वेशभूषा करून आली आहेस, तेव्हा तू खऱ्या आयुष्यात कधी नववधू होणार आहेस,’’ असा बाऊन्सर एका पत्रकाराने टाकल्यावर त्यावर हसून सिक्सर ठोकताना श्रद्धा म्हणाली, ‘‘मी एक स्त्री आहे. मला जेव्हा वधू व्हायचे असेल तेव्हा मी होईल.’’ तिच्या या मजेशीर उत्तराला सर्व उपस्थितांनी हसून दाद दिली. श्रद्धाने दिलेल्या उत्तराशी साधर्म्य असलेला डायलॉग  'स्त्री २' या चित्रपटात आहे.

'स्त्री २' हा श्रद्धा कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. 'स्त्री' चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाबाबत श्रद्धा खूप उत्सुक आहे. श्रद्धा काही काळापासून स्क्रिप्ट रायटर राहुल मोदीला डेट करत आहे.

गेल्या महिन्यात श्रद्धाने इन्स्टाग्रामवर राहुल मोदीसोबतच्या नातेसंबंधाची अधिकृत घोषणा केली होती. तिने राहुलसोबतचा एक सेल्फी पोस्ट केला आणि एक मजेशीर कॅप्शनही लिहिले. तिने लिहिलं होतं, ‘‘दिल रख ले, नींद तो वापस दे दे यार...’’ या पोस्टसोबत श्रद्धाने 'इश्क' चित्रपटातील 'नींद चुराई मेरी' हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वापरले होते. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story