नाचतोय तो मुथय्या की किरण जोपले ?

विकी कौशलच्या 'बॅड न्यूज' चित्रपटातील 'तौबा तौबा' गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्यावर फक्त सर्वसामान्य युजर्सच नाही तर सेलिब्रिटीदेखील रील तयार करत आहेत. यातील अनेक रीलदेखील व्हायरल होत असताना, आता एक नवे रील चर्चेत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 1 Aug 2024
  • 01:43 pm
Vicky Kaushal', Bad News Movie, Tauba Tauba song, reels are also going viral,

संग्रहित छायाचित्र

विकी कौशलच्या  'बॅड न्यूज' चित्रपटातील 'तौबा तौबा' गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्यावर फक्त सर्वसामान्य युजर्सच नाही तर सेलिब्रिटीदेखील रील तयार करत आहेत. यातील अनेक रीलदेखील व्हायरल होत असताना, आता एक नवे रील चर्चेत आहे. याचे कारण या गाण्यात श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधन डान्स करताना दिसत आहे. नेटकरी सगळीकडे हा व्हीडीओ शेअर करत असून मुथय्या मुरलीधरनचे कौतुक करत आहेत.

तुम्ही व्हीडीओ पाहिलात तर त्याच्यामध्ये एका डान्स क्लासमध्ये सर्वजण नाचत आहेत. यातील मुख्य डान्सर हुबेहूब मुथय्या मुरलीधन वाटत आहे. पण जसे  दिसत आहे त्यापेक्षा सत्य वेगळे आहे. याचे कारण व्हीडीओत जो डान्स करत आहे तो मुरलीधरन नसून, कोरिओग्राफर किरण जोपले आहे. किरण जोपले याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तुम्ही जाऊन पाहिले तर हा व्हीडीओ तुम्हाला तिथे दिसेल. पण व्हीडीओत किरण आणि मुरलीधरन यांच्यात इतके साम्य वाटत आहे की नेटकरी बुचकळ्यात पडले आहेत. अनेकांनी हा व्हीडीओ शेअर करताना मुरलीधरन इतके चांगले नाचू शकतो याची कल्पनाच नव्हती असे म्हटले.  पण अखेर सत्य समोर आल्यानंतर त्यांची शंका दूर झाली आहे.

किरण जोपले याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला हा व्हीडीओ असून, त्यानुसार ते त्यांच्या विद्यार्थ्यांसह डान्स करत आहेत. यात त्यांचे हावभाव, हास्य सगळे काही मुरलीधरन नाचतोय की काय असे वाटते आहे. 'तौबा तौबा' गाण्याची कोरिओग्राफी बॉस्कोने केली आहे. हे गाणे प्रसिद्ध झाल्यानंतर विकीला सर्व क्रेडीट मिळत असल्याने त्याने नाराजी जाहीर केली होती. त्यानंतर विकी कौशलनेही त्यावर प्रतिक्रिया दिली होती. बॉस्कोने गाण्याला प्रसिद्धी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पण हा ट्रेंड, प्रसिद्धी मिळत असताना कोरिओग्राफर्स दुर्लक्ष होत असल्याची नाराजीही त्याने बोलून दाखवली.

तौबा तौबा गाणे व्हायरल होण्यामागे कोरिआग्राफर्सचीही तितकीच मेहनत असताना, त्यांची योग्य ती दखल घेतली जात नाही,असे बॉस्कोने म्हटले होते. विकी कौशलनेही आपण बॉस्कोच्या मताशी सहमत असल्याचे सांगितले.  कॅमेऱ्यामागे असणाऱ्यांना कॅमेऱ्यावर येणाऱ्यांइतकेच महत्त्व दिले जावे, असे त्याने म्हटले आहे. स्टंट डायरेक्टरचा मुलगा असणारा विकीने चित्रपट बनवण्यासाठी अनेक लोक लागतात, त्यामुळे एकाच व्यक्तीला श्रेय मिळू नये असे म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story