सलग दहा फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही 'या' सिनेमाने बेबोला पुन्हा बनवले बॉलिवूडची स्टार

बॉलिवूडची क्वीन बेबो, म्हणजेच करीना कपूर खान! करिनाने एकेकाळी सलग दहा चित्रपट फ्लॉप दिले होते. यामुळे बेबो डिप्रेशनमध्ये गेली होती, पण बेबोच्या आयुष्यात एक सिनेमा आला आणि त्यामुळे ती पुन्हा बॉलिवूडची स्टार झाली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूड अभिनेत्यांनी भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीची चर्चा नेहमीच होते, मात्र काही अभिनेत्री असतात ज्या आपल्या कामाची दखल घ्यायला भाग पाडतात. आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकून ट्रेंड सेट करणाऱ्या अनेक अभिनेत्री इंडस्ट्रीत आहेत. इंडस्ट्रीत टिकण्यासाठी हिट चित्रपट देणे अत्यावश्यक आहे. अशीच एक अभिनेत्री जी तिच्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायची, तिला करिअरमधील आव्हानात्मक टप्प्याला सामोरे जावे  लागले.  फ्लॉप झालेल्या चित्रपटांच्या मालिकेनंतर, तिचा स्टारडम ओसरतोय असे वाटत असताना तिच्या करिअरला एक अनपेक्षित ट्विस्ट मिळाला. ही अभिनेत्री आहे बॉलिवूडची क्वीन बेबो, म्हणजेच करीना कपूर खान! करिनाने एकेकाळी सलग दहा चित्रपट फ्लॉप दिले होते. यामुळे बेबो डिप्रेशनमध्ये गेली होती, पण बेबोच्या आयुष्यात एक सिनेमा आला आणि त्यामुळे ती पुन्हा बॉलिवूडची स्टार झाली.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबरोबर केला होता. 'जब वी मेट’च्या आधी माझे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. मला पुढे काय होईल याची चिंता वाटायला लागली होती, आणि त्यावेळी माझ्याकडे बराच मोकळा वेळ होता, असे करीना म्हणाली आहे. शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या प्रेमप्रकरणाचा शेवट ‘जब वी मेट’ च्या शूटिंगदरम्यान झाला असे म्हटले जाते. या कठीण काळानंतर करीनाने तिच्या तेव्हाच्या प्रियकराबरोबर म्हणजेच शाहीद कपूर बरोबर ‘जब वी मेट’ सिनेमा केला आणि तिच्या करिअरची गाडी पुन्हा रुळावर आली. १५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने ५० कोटींची कमाई केली. ‘जब वी मेट’ २००८ या वर्षातील सर्वात मोठा हिट ठरला. या चित्रपटानंतर करीनाच्या करिअरला नवा जोम मिळाला. पुढे तिने ‘थ्री इडियट्स’ सारखे अनेक हिट सिनेमे दिले.  या चित्रपटानंतर दोघं पुन्हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात एकत्र आले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती आणि समीक्षकांचंही कौतुक मिळवले होते. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story