दहा वर्षांपासून लटकलेला अजय देवगणचा 'हा' सिनेमा होणार आता प्रदर्शित

अजय देवगणच्या या आगामी चित्रपटाचे नाव 'नाम' असणार आहे. येत्या २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अनीस बज्मी आणि अजय देवगण या दोघांचेही सिनेमे या दिवाळीत प्रदर्शित होणार आहेत. एकीकडे अजय देवगण आणि रोहित शेट्टी चाहत्यांसाठी 'सिंघम अगेन' घेऊन येणार आहेत. तर दुसरीकडे कार्तिक आर्यनचा मल्टीस्टारर चित्रपट 'भूल भुलैया 3' देखील दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर होणार आहे. दुसरीकडे हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर दोघेही एकत्र चित्रपट आणण्याच्या तयारीत आहेत. पण हा नवा चित्रपट नाही, हा एक दशकांपूर्वीचा चित्रपट आहे जो कधीच प्रदर्शित झाला नाही.

अनेक वर्षांनंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी अखेर निर्माते हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. अजय देवगणच्या या आगामी चित्रपटाचे नाव 'नाम' असणार आहे. येत्या २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शनिवारी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आणि अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अनिल रुंगटा प्रॉडक्शनचा हा चित्रपट इतक्या वर्षांनंतर का प्रदर्शित होत आहे आणि हा चित्रपट इतकी वर्षे का पुढे ढकलला जात होता, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अजय देवगण आणि भूमिका चावला यांच्याव्यतिरिक्त समीरा रेड्डी देखील 'नाम' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण आणि अनीस बज्मी यांनी हलचल, प्यार तो होना ही था आणि दिवांगी सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या आगामी 'नाम' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर निर्मात्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या चित्रपटाचे चित्रीकरण २०१४मध्ये झाले होते परंतु नंतर एका निर्मात्याच्या निधनामुळे त्याचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. वितरक आणि निधीच्या अडचणींमुळे हा चित्रपट बराच काळ रखडला होता. आता या चित्रपटाला वितरक आणि फायनान्सर मिळाल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चाहत्यांना अजय देवगण पुन्हा एकदा 'बाजीराव सिंघम'च्या अवतारात पाहायला मिळणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण आणि करीना कपूर खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर, अनीस बज्मी सर्वप्रथम भूल भुलैया ३ चाहत्यांसाठी घेऊन येणार आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story