संग्रहित छायाचित्र
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात हे गाणे लॉन्च करताना विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांनी या गाण्यावर लाईव्ह परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्सदरम्यान विद्याचा पाय तिच्या साडीत अडकला आणि ती स्टेजवर पडली. तथापि विद्याने हा क्षण सुंदरपणे हाताळला आणि त्याचे नृत्य स्टेपमध्ये रूपांतर केले.
स्टेजवर पडलेल्या विद्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पडताच विद्या स्टेजवर बसली मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या या गाण्याच्या लाँचिंग कार्यक्रमात कार्तिक, विद्या आणि माधुरीसह चित्रपटाचे निर्मातेही उपस्थित होते.
येथे विद्या आणि माधुरीने गाण्यावर परफॉर्म करून ते लॉन्च केले. या परफॉर्मन्सदरम्यान विद्या डान्स करताना स्टेजवर पडली आणि जमिनीवर बसली. मात्र, तिने लगेचच क्षणाचा ताबा घेतला आणि आपल्यासोबत काय झाले हे कोणालाही कळू दिले नाही.
या परफॉर्मन्सनंतर विद्या म्हणाली, ‘‘या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत काम करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे.या चित्रपटाच्या शूटिंगवेळी माझी बहिण मला नेहमी म्हणायची, ‘तुला कधी माधुरीसारखे व्हायचे होते आणि आज तू तिच्यासोबत नाचत आहेस, ही मोठी गोष्ट नाही का?’ होय, ही माझ्यासाठी खरंच मोठी गोष्ट आहे. मी कायम माधुरीजींच्या प्रेमात आहे. आजही बघा, मी स्टेजवर पडले होती, पण नंतर उठून माधुरीजींच्या भरवशावर परफॉर्म केले.’’
‘आमी जे तोमार’ या गाण्यात दोन्ही अभिनेत्री जबरदस्त फेस ऑफ करताना दिसत आहेत. व्हारयरल व्हीडीओवर युझर्सच्या अनेक कमेंट्स येत आहेत. ‘‘विद्या बालन ती आहे जी पडताच स्वतःला सावरते,’’ असे एका फॅनने म्हटले आहे. हा व्हायरल व्हीडीओ पाहून अनेकांनी विद्याचे कौतुक केले आहे, तर काहींनी हा तिवा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे.
एका यूझरने लिहिले, ‘‘जी पडल्याबरोबर सावरतो तिला विद्या बालन म्हणतात.’’ दुसऱ्याने लिहिले,‘‘विद्याने तो क्षण ज्या प्रकारे हाताळला , ते पाहून मजा आली.’’ अनेक युझर्सनी विद्याच्या डान्सचे खूप कौतुक केले. 'भूल भुलैया ३' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर येत्या १ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर रोहित शेट्टीच्या मल्टीस्टारर चित्रपट 'सिंघम अगेन'शी होणार आहे.