संग्रहित छायाचित्र
सध्या हिंदी टेलिव्हिजन दुनियेत बिग बॉस १८ हा शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरल्याचं दिसतंय. गेल्या दोन दिवसांपासून 'वीकेंड का बार'मध्ये कोणत्या स्पर्धकाला बिग बॉस बाहेरचा रस्ता दाखवला जाणार याविषयी उत्सुकता होती. अखेर शनिवारच्या (दि. २६) एपिसोडमध्ये मुस्कानचा घरातील प्रवास संपल्याचे बिग बॉसने जाहीर केले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मुस्कान बामणे हिने घरातील अनुभवाविषयी सांगितले.
आपल्या मनात जे आहे ते तिथल्या तिथे बोलायला हवे. हे मी बिग बॉसच्या घरात शिकले असे मुस्कान म्हणाली. कोणतीही गोष्ट मनात न ठेवता तिथल्या तिथे बोलून टाकायची हे मी शिकले. घरातील अनुभव मजेशीर आणि अनुभव देणारा होता. प्रत्येक जण आपापल्या परिणाम चांगला खेळत आहेत. मला सध्या तरी हे सांगता येणार नाही, असे मुस्कान म्हणाली. जर पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाता आले तर नक्की जाईन आणि खूप बोलेन. मुस्कानच्या मते घरात टॉप थ्री मध्ये विवियन, शिल्पा आणि करणवीर हे तिघे जातील.
घरातील तिच्या एक्सिटने नेटकरीही तिला पाठिंबा देताना दिसत आहेत. अनेकांना तिचा बिगबॉसमधील प्रवास थांबवणे पटलेले दिसत नाही. कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोखालील कमेंटमध्ये अनेकांच्या अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. बिग बॉसच्या घरात सर्वात पहिल्यांदा मी ज्यांच्याशी बोलले शहजादा, अविनाश आणि विवियन हे बिग बॉसच्या घरातील माझे सगळ्यात चांगले मित्र होते, असे मुस्कान बामणे हिने सांगितले. बिग बॉसच्या घरात तिसरा आठवडा सुरू असून आता घरातील एका स्पर्धकाला घराबाहेर पडावे लागणार आहे. हा घरातून एलिमिनेट होऊन बाहेर पडणारा दुसरा स्पर्धक असेल. बिग बॉसच्या प्रोमोनुसार, सारा, मुस्कान आणि ताजिंदर या तिघांपैकी एक जण बिगबॉसच्या घराला निरोप देणार आहे. कलर्स टीव्हीने प्रोमो शेअर करत त्यावर एलिमिनेशनच्या प्रक्रियेतून होणार आहे बिग बॉसच्या एका सदस्याचा 'द एन्ड' असे लिहिले आहे, असे मुस्कान हसत म्हणाली.