'अनिकेत, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो'
आपल्या अफलातून टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेतचा शुक्रवारी वाढदिवस होता. या निमित्ताने निवेदिता सराफ यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
निवेदिता सराफ या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्या कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकतेच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अशोक सराफ आणि अनिकेत सराफ यांच्याबरोबरचा एक छान फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना निवेदिता यांनी अनिकेतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“आज आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे,
कारण आज तुझा वाढदिवस आहे. प्रिय अनिकेत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अपार मेहनत, संवेदनशीलता, विनोदबुद्धी आणि विश्वासाच्या जोरावर तू ज्या पद्धतीने स्वत:च्या पायावर उभा राहिलास, त्याबाबत आम्हाला तुझा अभिमान वाटतो. खूप खूप प्रेम”, असे निवेदिता सराफ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत हा शेफ आहे. त्याला जेवण बनवण्यात फार रस आहे. बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्याला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. त्यामुळे त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले आहे.
अनिकेतचे शिक्षण हे फ्रान्समध्ये झाले आहे. तो एक उत्कृष्ट शेफ असून, पाश्चिमात्य पद्धतीचे भोजन तो खूपच छान करतो. त्याने यू ट्यूबवर ‘निक सराफ’ या नावाने चॅनल सुरू केले आहे. त्यात तो जेवण करतानाचे अनेक व्हीडीओदेखील शेअर करत असतो.