संग्रहित छायाचित्र
बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक रोमँटिक चित्रपट तयार होतात. आजकाल बऱ्याच चित्रपटांमध्ये रोमँटिक व किसिंग सीन असतात. असे सीन शूट करणे खूप अवघड असते. अनेकदा कलाकार एकमेकांबरोबर कंफर्टेबल नसतात, त्यामुळे सीन नीट शूट होत नाही आणि रिटेक घ्यावे लागतात. अशाच एका सीनचा किस्सा बॉलिवूडमध्ये खूप गाजला होता. एका चित्रपटातील किसिंग सीनसाठी अभिनेत्याने तब्बल ३७ रिटेक घेतले होते.
या चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्याने आतापर्यंत १८ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी आठ चित्रपट सुपरहिट झाले आणि तीन चित्रपटांनी जबरदस्त कमाई केली, तसेच अनेक रेकॉर्ड मोडले. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय असलेल्या या अभिनेत्याने एका रोमँटिक सीनसाठी एक दोन नव्हे तर तब्बल ३७ रिटेक घेतले होते. अभिनेत्रीमुळे इतके रिटेक घ्यावे लागले, असे त्याने म्हटले होते. ही गोष्ट १० वर्षांपूर्वी म्हणजेच २०१४ मधील ‘कांची: द अनब्रेकेबल’ चित्रपटाची आहे. या चित्रपटात अभिनेत्री मिष्टी चक्रवर्ती व कार्तिक आर्यन यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात कार्तिकने एका प्रेमात पडलेल्या तरुणाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. या चित्रपटात एक किसिंग सीन होता, ज्यामुळे कार्तिक नाराज झाला होता.
कार्तिक आर्यनने एका मुलाखतीत या किसिंग सीनबद्दल सांगितले की, हा किसिंग सीन एवढा मोठा डोकेदुखी ठरेल, असे मला कधीच वाटले नव्हते. त्या दिवशी आम्ही प्रेमी युगुलांसारखे वागत होतो. पण एक सीन नीट शूट व्हावा, यासाठी आम्हाला ३७ रिटेक करावे लागले. शेवटी सुभाषजी आले आणि ‘ठीक आहे’ म्हणाले तेव्हा आम्हाला वाटले की झाले बाबा एकदाचे. दरम्यान ‘कांची: द अनब्रेकेबल’मध्ये मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, आदिल हुसेन, मुकेश भट्ट, चंदन रॉय सान्याल, रिषभ सिन्हा आणि महिमा चौधरी यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात मिष्टीने कांचीचे पात्र केले होते, तर कार्तिक आर्यन बिंदाच्या भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.