Ridhima Pandit : रिधीमा पंडित दिसणार मराठी चित्रपटात

हिंदी टीव्ही मालिका 'बहू हमारी रजनीकांत'ने घराघरात नाव कोरलेली रिधीमा पंडित आता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या आगामी 'महेशता बदला' या मराठी चित्रपटात अंकुश चौधरीसोबत ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 30 Dec 2024
  • 02:00 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मराठमोळी रिधीमा पंडितने (Ridhima Pandit) नीरज पांडेच्या 'सिकंदर का मुकद्दर'मध्ये अनोखी ओळख निर्माण केली आहे. ती आता बॉलिवूडमध्ये आपली इनिंग खेळणार आहे. नीरज पांडे दिग्दर्शित नेटफ्लिक्सचा नवीन ब्लॉकबस्टर 'सिकंदर का मुकद्दर' ह्या चित्रपटाच्या कथानकाने आणि दमदार कलाकारांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अविनाश तिवारी, जिमी शेरगिल, तमन्ना भाटिया आणि दिव्या दत्ता यांचा समावेश आहे. या माध्यमातून रिधीमा पंडित ओटीटी पदार्पण करते.

रिधीमा बॉलिवूडमधील एन्ट्रीबद्दल म्हणाली की, ही भूमिका एक आव्हानात्मक आणि महत्त्वाची होती. मी प्रत्येक क्षणात मनापासून झोकून दिले होते आणि लोकांकडून त्याचे कौतुक पाहणे म्हणजे माझ्यासाठी रंजक आहे. अशा अतुलनीय अभिनेत्यांसोबत काम करणे हा एक मास्टरक्लास होता आणि मला दिलेल्या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे. 

हिंदी टीव्ही मालिका 'बहू हमारी रजनीकांत'ने घराघरात नाव कोरलेली रिधीमा पंडित आता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) यांच्या आगामी 'महेशता बदला' या मराठी चित्रपटात अंकुश चौधरीसोबत ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात ती गावात राहणाऱ्या एका साध्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. रिधीमाने हा चित्रपट तिच्या आजीला समर्पित केला आहे.

रिधीमाने मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि करण ग्रोवर अभिनीत 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेतून तिने अभिनयात पदार्पण केले. कृष्णा अभिषेक, अली असगर, सुगंधा मिश्रा, सुदेश लेहरी आणि संकेत भोसले या ख्यातनाम विनोदी कलाकारांसोबत तिने 'द ड्रामा' कंपनीमध्ये विनोदाचा ठसका दाखवला तर तिने डान्स चॅम्पियन्सचेही केले आणि फिअर फॅक्टरः खतरों के खिलाडी ९ मधील द्वितीय उपविजेती म्हणून ओळख मिळवली. 'हैवानः द मॉन्स्टर' या साय-फाय ड्रामामध्ये तिने परम सिंग आणि अंकित मोहन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत अमृताची भूमिका साकारली आहे.

Share this story

Latest