संग्रहित छायाचित्र
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने नवीनच वळण घेतले आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू असताना एका नवीन वादाला तोंड फुटले आहे.
भाजप आमदार सुरेश धस मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांचा उल्लेख केला. त्यानंतर वादाला तोंड फुटले. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी प्राजक्ता माळी यांना पाठिंबा दिला आहे.
किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत लिहिले,
प्राजक्ताबाबतचे विधान निंदनियचं आहे…त्याचा निषेध. पण सोनियाजींचे बिकीनीवरचे फोटो व्हायरल झाले होते…कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होत्या…मणिपूरला भगिनींची विटंबना झाली…तेव्हा जे महाभाग मूग गिळून वगैरे गप्प बसले, त्यांना अचानक भयानक ‘समस्त महिला वर्गाविषयी’ पुळका वगैरे यावा हे फार विनोदी वगैरे आहे…#सुमारांचा_थयथयाट
कुशल बद्रिके यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले,
कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा ३/४ वेळा परळीला गेलोय, काय ते परळी पॅटर्न का काय म्हणतात तशी मी सुध्दा नाचताना कंबर हलवली पण मला त्याचं कधी काही वाटलं नाही, वाटलं किती छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे. पण आता मात्र “धस “ होतय काळजात, कुणाचं ठाऊक स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेत सुद्धा एखाद्याला intrest यावा. बिड मध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध!! प्राजक्ता मी तुझ्या सोबत आहे.
सचिन गोस्वामी यांनी पोस्ट करत लिहिले,
ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो.कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळी बाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे..क्लेषदायक आहे.. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या.
गौतमी पाटील हिने म्हटले,
प्राजक्ता ताई, आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत आहोत. या गोष्टीवरून ट्रोल जरी केलं तरी लक्ष देऊ नकोस. तू पत्रकार परिषदेत जे काही बोलली ते मी मगाशी ऐकलं. तू जे काही बोलली ते सगळं बरोबर होतं.