आमदार सुरेश धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळं राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता या वादात टी व्ही अभिनेता कुशल बद्रीकेने उडी घेत अभिनेत्री प्राजक्ता माळीला जाहिर पाठिंबा दर्शवला आहे. राज्यात सुरु असलेल्या या वादावर सोशल पोस्ट करत कुशल बद्रीकेने त्याच्या खास शैलीत सुरेश धस यांना उत्तर दिलं आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं होतं. "प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे." असं धस यांनी म्हटलं होतं. धस यांचा हाच मुद्दा पकडत कुशल बद्रीकेने खास पोस्ट केली आहे. जी जोरदार चर्चेत आली आहे.
पण आता मात्र “धस “ होतय काळजात
कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा ३/४ वेळा परळीला गेलोय, काय ते परळी पॅटर्न का काय म्हणतात तशी मी सुध्दा नाचताना कंबर हलवली पण मला त्याचं कधी काही वाटलं नाही, वाटलं किती छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे. पण आता मात्र “धस “ होतय काळजात, कुणाचं ठाऊक स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेत सुद्धा एखाद्याला intrest यावा. बिड मध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध!!
प्राजक्ता मी तुझ्या सोबत आहे.
View this post on Instagram
अशा आशयाची पोस्ट कुशल बद्रीकेने केली आहे. प्राजक्ताला अनेक भाजप नेत्यांसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. याप्रकरणावरून प्राजक्ता माळी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. आरोप करणारे धस भाजपचेच आहेत. त्यामुळं अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.