अमिताभ यांना टोला

मुकेश खन्ना अलीकडेच त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर 'शक्तिमान रिटर्न्स' म्हणून दिसले आहेत, ज्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा गाणेदेखील गायले आहे. एकीकडे काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत, तर दुसरीकडे काही लोक याला त्याच्या 'शक्तिमान' चित्रपटाची तयारी म्हणून पाहत आहेत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुकेश खन्ना अलीकडेच त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर 'शक्तिमान रिटर्न्स' म्हणून दिसले आहेत, ज्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा गाणेदेखील गायले आहे. एकीकडे काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत, तर दुसरीकडे काही लोक याला त्याच्या 'शक्तिमान' चित्रपटाची तयारी म्हणून पाहत आहेत. या गायलेल्या गाण्यावरून मुकेश यांनी अमिताभ बच्चन यांना टोला लगावला आहे.

आपल्या गायनकलेबद्दल बोलताना मुकेश म्हणाले, ‘‘मी बाथरूम सिंगर होतो. तलत महमूद साहेब माझे आवडते आहेत. माझा गायक बनण्याचा कोणताही हेतू नाही, पण या गाण्यात शान आणि जावेद अली यांची जागा मी घेतली आहे, असे मी म्हणायला हवे. मी विसंगत गायलो आहे, असे कोणी म्हणणार नाही. गाणे बनवायला सहा महिने लागले. याआधी ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की’ करणार होतो. व्हिडीओही शूट केला होता, पण आजकालची मुलं गुगल मॅपवर सगळं बघतात असं मला वाटलं. याशिवाय गाण्यांच्या हक्कांबाबतही अडचण होती. ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की’ हे 'जागृती' चित्रपटातील गाणे आहे, त्याचे हक्क सारेगामाकडे आहेत. आम्ही त्यांच्याशी गाण्याच्या हक्कांबद्दल बोललो तेव्हा त्याने सांगितले की, नफ्यात ७० टक्के वाटा त्यांचा असेल आणि ३९०  टक्के आमचा असेल. मला त्यांचा व्यवहार आवडला नाही.’’

आम्ही काही मूळ गाण्यांवर काम करण्याचा विचार केला. जेव्हा गीतकार दीपक त्रिपाठी यांनी 'कथा आझादी के वीरों की' लिहिली तेव्हा मला वाटले की मीही हे गाणे गाऊ शकतो. जर अमिताभ बच्चन साहेब ‘आओ बच्चों तुमको शेर की कहानी सुनाते हैं’ गात असतील तर मी का नाही गाऊ शकत? लोकांना समजू लागले की या गाण्याच्या माध्यमातून मी माझ्या 'शक्तिमान' चित्रपटाचा शक्तिमान कोण असेल हे सांगायला आलो आहे? मात्र, तसे नाही. मी 'शक्तिमान रिटर्न्स'च्या माध्यमातून मुलांना शिकवण्यासाठी आलो आहे, जे शक्तिमान पूर्वीपासून करत आहे. आजच्या मुलांची विचारसरणी खूप वाईट झाली आहे, अशी खंत मुकेश यांनी व्यक्त केली.

मला शक्तिमानसाठी सौम्य चेहरा असलेला अभिनेता हवा आहे. त्याच्यात शिक्षकाचे गुण असले पाहिजेत. मी एकदा गमतीने म्हणालो होतो की टायगर श्रॉफ मुलांना काय शिकवू शकेल? मुलं स्वतःच त्याला माझ्यासोबत बसायला सांगतील. रणवीर सिंग माझ्यासोबत तीन तास बसला, पण मला त्याच्यात शक्तिमान दिसला नाही. ज्या व्यक्तीने अलाउद्दीन खिलजीची भूमिका केली आहे, तो शक्तिमान कसा बनू शकतो? शक्तिमान हे राम आणि कृष्णाच्या पातळीवरील पात्र आहे. शक्तिमान मोठा स्टार झालाच असे नाही. आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही, मला शक्तिमानच्या ऑडिशन्स संपूर्ण देशात घ्यायच्या आहेत, असे मुकेश शर्मा म्हणाले.

 
 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story