सिंघम आता शांत झालाय....

रोहितज शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट १ नोव्हेंबरला रिलीज झाला, यामध्ये बॉलिवूडच्या अनेक मोठ्या स्टार्सनी कॅमिओ केला आहे. दरम्यान, एका मुलाखतीत रोहित शेट्टी आणि अजय देवगणला त्याचे जुने दिवस आठवले.

Singham,Singham Again,Rohit Shetty,Bollywood ,Ajay Devgan

संग्रहित छायाचित्र

रोहितज शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट १ नोव्हेंबरला रिलीज झाला, यामध्ये बॉलिवूडच्या अनेक मोठ्या स्टार्सनी कॅमिओ केला आहे. दरम्यान, एका मुलाखतीत रोहित शेट्टी आणि अजय देवगणला त्याचे जुने दिवस आठवले. अजय म्हणाला, एक काळ असा होता की तो खूप रागावायचा, पण आता तो शांत झाला आहे.

 अजयने कबूल केले की, पूर्वी तो मारामारीच्या वेळी हॉकी स्टिक वापरत असे. रोहित शेट्टीने सांगितले की, अजय नेहमी त्याच्या कारमध्ये हॉकी स्टिक ठेवतो. त्यावर अजय म्हणाला, ‘‘हो, पूर्वी माझ्या कारमध्ये हॉकी स्टिक असायची. पण आता मी शांत झालो आहे. आता मी मारामारी करत नाही. मला असे वाटते की हा वेळेचा अपव्यय आहे आणि फक्त समोरच्या व्यक्तीला त्रास देणे आहे, म्हणून मी आता भांडणे टाळतो.’’

ॲक्शन चित्रपटांबाबत अजय देवगण म्हणाला, 'पूर्वीचे ॲक्शन चित्रपट आणि आताचे चित्रपट यात खूप फरक आहे. आता तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आमच्या पिढीत, जॅकी श्रॉफपासून अमिताभ बच्चनपर्यंत, जेव्हा ते ॲक्शन सीन करायचे, तेव्हा खरी मर्दानी ताकद आणि व्यक्तिमत्त्व होते जे आजकाल दिसत नाही.

रोहित शेट्टीने पूर्वीच्या चित्रपटांमधील नायकांचे ॲक्शन सीन आणि सध्याच्या चित्रपटांमधील ॲक्शन सीनमधील फरकाबद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘‘मी अजयशी सहमत आहे. चित्रपटांमध्ये, जेव्हा अक्षय आणि अजय देवगण दहा लोकांना मारत होते किंवा सनी देओल हातपंप उखडत होता तेव्हा आम्ही टाळ्या वाजवायचो. कारण आम्हाला खात्री होती की ते करू शकतात. पण आजच्या पिढीत हे खरंच कोणी करू शकतं, असं आपल्याला वाटत नाही.’’

Share this story