सेटवर उशिरा पोहोचल्याने ‘बिग बी’ना खावी लागली बोलणी

अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या ‘एकलव्य : द रॉयल गार्ड’ या चित्रपटात काम केले होते. ‘कौन बनेगा करोडपती’शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी उघड केले की एके दिवशी ते चित्रपटाच्या सेटवर १० मिनिटे उशिरा पोहोचले आणि दिग्दर्शक विधू यांनी त्यांना संपूर्ण क्रूसमोर फटकारले होते.

Big B,Eklavya: The Royal Guard,Amitabh Bachchan,Vidhu Vinod Chopra,Kaun Banega Crorepati

संग्रहित छायाचित्र

अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या ‘एकलव्य : द रॉयल गार्ड’ या चित्रपटात काम केले होते.  ‘कौन बनेगा करोडपती’शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी उघड केले की एके दिवशी ते चित्रपटाच्या सेटवर १० मिनिटे उशिरा पोहोचले आणि दिग्दर्शक विधू यांनी त्यांना संपूर्ण क्रूसमोर फटकारले होते.

विधू यांच्या ‘१२वी फेल’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता विक्रांत मॅसी ‘केबीसी’च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दिसला होता. यावेळी ‘बिग बी’नी विधू यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला. ते म्हणाले, ‘‘आम्ही चित्रपटाचे शूटिंग करत होतो आणि रात्री उशीर झाला होता. तीनच्या सुमारास आम्ही पॅक अप केले. पॅकअप झाल्यावर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता सेटवर यायला सांगितले. मी आश्चर्यचकित होऊन विधूंना म्हणालो, ‘‘तू वेडा आहेस का? एवढ्या उशिरा पॅकअप करून मी उद्या इतक्या लवकर यावे, असे का वाटते?’’

यावर विधू यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. हा किस्सा सांगताना अमिताभ म्हणाले, ‘‘मी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सेटवर पोहोचलो. त्यावर विधू यांनी संपूर्ण टीमसमोर मला खडसावले की, तुम्हाला दहा मिनिटे उशीर झाला. यावेळी मी त्यांना माफी मागून मोकळा झालो.

सैफ अली खान, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, विद्या बालन आणि शर्मिला टागोर सारखे सेलिब्रिटी २००७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एकलव्य’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसले होते. ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ३८ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती विधू विनोद चोप्रा यांनी केली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story