संग्रहित छायाचित्र
ॲमेझाॅन प्राईमवर ‘सिटाडेल : हनी बनी’ ही मालिका ६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाली. या मालिकेत वरुण धवन आणि सामंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेच्या शूटिंगदरम्यान सामंथाची तब्येत बिघडली होती. एकदा ती सेटवर बेशुद्ध पडली होती. यामुळे सर्वजण घाबरले होते.
मालिकेच्या शूटिंगदरम्यान सामंथाला समजले की तिला मायोसिटिस नावाचा दुर्मिळ आजार आहे. यानंतर तिला मालिका सोडायची होती. अलीकडेच हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत सामंथा म्हणाली की, मालिकेच्या निर्मात्यांनी तिला पाठिंबा दिला नसता आणि प्रोत्साहन दिले नसते तर तिला पुन्हा कॅमेऱ्यासमोर येण्यास बराच वेळ लागला असता.
यावर वरुण धवन म्हणाला, सेटवर अशा दोन घटना घडल्या ज्याने माझे हृदय अक्षरशः तुटले. मी खूप काळजीत होतो. मला आठवते की एके दिवशी आम्ही शूटिंग करत होतो, सामंथाने मला तिच्या स्थितीबद्दल जास्त सांगितले नाही. तिने नुकतेच डोळे मिटले आणि दोन तासांनंतर सेटवर ऑक्सिजनच्या टाक्या आल्या. ती कोपऱ्यात ऑक्सिजन घेत होती. त्या दिवशी तिला सुटी घेता आली असती, पण तरीही ती सेटवर ऑक्सिजन घेत होती.
दुसरी घटना म्हणजे आम्ही रेल्वे स्टेशनवर शूटिंग करत होतो. ती माझ्या मागे धावत येत होती. कॅमेरा पार करावा लागला. मी कॅमेरा गाठला आणि सामंथा तिथेच पडली. जेव्हा समंथा बेशुद्ध झाली तेव्हा मी खूप अस्वस्थ होतो. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी घाबरलो होतो. टीम युनिटने तातडीने धाव घेत तिची योग्य ती काळजी घेतली.
२०२२ मध्ये सामंथाने एक पोस्ट शेअर केली होती की तिला मायोसिटिस नावाचा दुर्मिळ आजार आहे. मायोसिटिसचे निदान झाल्यानंतर, सामांथाने चित्रपटांमधून ब्रेक घेतला. डॉक्टरांनीही तिला सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. हा एक प्रकारचा स्वयं-प्रतिकार रोग आहे ज्यामध्ये शरीराचे स्नायू हळूहळू कमकुवत होतात. या स्थितीत, चालणे आणि उभे राहण्यास त्रास होतो.