समंथा रूथ प्रभू
वरुण धवन एका टॉक शो मध्ये आपली मुलगी आणि बायको विषयी बोलत होता. त्यावेळी समोर बसलेल्या समंथा रूथ प्रभूचा चेहरा अगदीच पडला. एक क्षण असे वाटले की तिच्या डोळ्यातून आता अश्रु येतात की काय. मात्र तिने स्वत: ला सावरले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ खाली कमेंट करून लोक समंथाला धीर देताना दिसत आहे.
वरुण आणि समंथाची 'सीटाडेल हनी बनी' ही सिरिज नुकतीच रिलीज झाली आहे. या सिरिजच्या प्रमोशनसाठी दोघेही ठिकठिकाणी मुलाखती देत आहेत. एका कार्यक्रमामध्ये वरुण धवन आपल्या लेकी आणि बायकोविषयी भरभरून बोलत होता. मी आणि नताशा फॅमिली प्लॅनिंग करत होतो. माझी छोटी फॅमिली असावी असे असं मला वाटत होतं.
या सिरिजमधील बनी या पात्राशी त्यामुळे मी जुळवून घेवू शकलो. कारण खऱ्या आयुष्यात मी त्या परिस्थितीतून जात होतो. मला एक मुलगी आहे. तिच्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, असे वरुण म्हणाला. वरुण हे बोलत असताना समंथाचा चेहराच पडला. तिने खाली बघितले. तिच्या चेहऱ्यावरून तिला भरून आले आहे हे स्पष्ट जाणवत होते. तिच्या डोळ्यातून अश्रू येतात की काय असे वाटत होते.
समंथाचा हा व्हिडिओ बघून चाहत्यांना खूप वाईट वाटले. या व्हिडिओवर कमेंट करून चाहत्यांनी तिला धीर दिल्याचे बघायला मिळाले. समंथा आणि नागा चैतन्य यांचा २०२१ मध्ये घटस्फोट झाला होता. २०१९ मध्ये लग्न झाल्यावर त्यांचा संसार केवळ दोन वर्षे टिकला. या दरम्यान समंथाने मोठ्या आजाराचा सामना केला. या सगळ्याचं दु:ख तिच्या चेहऱ्यावर झळकलं .
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.