संग्रहित छायाचित्र
शाहरुख खानने यश चोप्रांच्या अनेक चित्रपटांत काम केले. किंग खानचे बहुतेक 'कल्ट' सिनेमे हे यश चोप्रांनी बनवले आहे. मात्र शाहरुख खानच्या एका चित्रपटातील एका गाण्याचे यश चोप्रा हे मोठे चाहते होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ते गाणे आपल्या मोबाइल फोनची रिंगटोन म्हणून ठेवले होते. हे गाणे म्हणजे 'वीर झारा' चित्रपटातील 'तेरे लिये' हे गाणे. यश चोप्रांना हे गाणे इतके पसंत होते की शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ते रिंगटोन म्हणून ठेवले होते. खरं म्हणजे 'वीर झारा' चित्रपटातील सगळीच गाणी सुपरहिट होती.
'वीर झारा' या चित्रपटाला २० वर्षे झाली. शाहरुख खान, प्रिती झिंटा, राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनीच केले होते. दिग्गज संगीतकार संजीव कोहली यांनी त्यांचे वडील मदन मोहन यांचे संगीत या चित्रपटासाठी वापरले. संजीव कोहली म्हणाले, 'वीर झारा' हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. ज्याला वास्तव मानन्याची हिंमत मी कधीही केली नाही. एका मुलाने आपल्या वडिलांच्या साठी बघितलेले स्वप्न पूर्ण झाले. माझे वडील दिवंगत संगीतकार मदन मोहन यांचे १९७५ साली केवळ ५१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना नवीन संगीत बनवण्याची संधी मिळली नाही. मोठे प्रोडक्शन हाऊसेस आणि पुरस्कार नेहमी त्यांच्यापासून दूर राहिले. या गोष्टीचे त्यांना खूप दु:ख होते.
संजीव कोहली यांनी पुढे सांगितले, २००३ मध्ये यश चोप्रा हे 'वीर झारा' चित्रपट बनवणार होते. त्यासाठी त्यांना थोडीशी जुन्या पठडीतील पश्चिमेच्या प्रभावापासून मुक्त असलेली गाणी हवी होती. त्यासाठी त्यांनी काही संगीतकारांची बैठक घेतली. त्यामध्ये बहुतेक संगीतकारांचे संगीत त्यांना पसंत पडले नाही. त्यावेळी मी त्यांना सांगितले की माझ्याकडे माझ्या वडिलांच्या काही धुन आहेत. गेली २८ वर्षे त्यांना ऐकले गेले नाही. त्यावर त्यांनी उत्साहपूर्वक मला त्या न ऐकलेल्या संगीताचा शोध घेण्यास सांगितले. जुन्या धुन वापरुन मी यांचे रेकॉर्डिंग केले. त्यासाठी डमी लिरीक्स वापरले गेले. एकूण ३० धुन होत्या. त्यापैकी १० गाण्यांची निवड झाली आणि सिनेमाच्या स्क्रिप्ट नुसार त्यांना चित्रपटात वापरले गेले.
पुढे ही गाणी लता मंगेशकर यांनी गायली. संजीव कोहली म्हणतात, माझ्या वडिलांचे संगीत भारतातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एका चित्रपटाचे साऊंडट्रॅक बनले. हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. हे सत्यात उतरत होते.