संग्रहित छायाचित्र
अजय देवगणचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट सिनेमाघरांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये वेगळीच क्रेझ दिसून येत होती. मात्र चित्रपट रिलीज झाल्यानंतर ही क्रेझ गायब झाली आहे. रिलीज होण्याआधी चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. मात्र चित्रपट रिलीज झाला तेव्हा मात्र लोकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे दिसले. हा चित्रपट फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे. या सगळ्यांसाथी समाजमाध्यमांवर पुन्हा एकदा अर्जुन कपूर याला कारणीभूत मानले जात आहे. लोक म्हणत आहे की रोहित शेट्टीने अर्जुन कपूरला चित्रपटात घेऊन रिस्क घ्यायला नको होती.
एका पॉडकास्टमध्ये रोहित शेट्टीने चित्रपटाशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या. रोहित शेट्टी याला अर्जुन कपूर बद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला, अर्जुन माझ्याकडे येत असायचा. त्याला सिंघमची संपूर्ण स्टोरी माहिती होती. त्यामधल्या खलनायकाची भूमिका मी करू शकतो असे तो म्हणाला होता.
रोहित शेट्टी पुढे म्हणाला, त्यावेळी अर्जुन कपूर सोशल मोडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत होता. त्यावेळी मी विचार केला की इतक्या मोठ्या स्टार कास्टसोबत अर्जुनला घेणे ही एक रिस्क आहे. परंतु केवळ तो ट्रोल होत होता म्हणून त्याला चित्रपट नाकारणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे मी त्याला चित्रपटात घेण्याचा विचार केला. मी विचार केला होता की जे काही ट्रोलिंग व्हायचे आहे ते त्याच्या एकट्याबद्दल होईल.
परंतु आता 'सिंघम अगेन' हा चित्रपट फ्लॉप होण्याच्या दिशेने जात असताना पुन्हा एकदा अर्जुन कपूरला नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरले आहे. तसेच रोहित शेट्टीने देखील अर्जुनला चित्रपटात घेऊन मोठी रिस्क घेतल्याची चर्चा आहे.
खरं तर, 'सिंघम अगेन' या चित्रपटाचे बजेट ३५० कोटींचे आहे. आतापर्यंत चित्रपटाने मुश्किलीने २०० कोटीं पर्यंत मजल मारली आहे. तसेच ३५० कोटींचा आकडा पार करणे चित्रपटाला शक्य आहे होईल का याबद्दल देखील साशंकता आहे. चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. सिंघम अगेन आणि भूल-भूलैया 3 या दोन चित्रपटांमध्ये महाक्लॅश झाल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे दोन्ही चित्रपटांच्या कमाईवर परिणाम झाला. तसेच अर्जुन कपूर हा देखील सिंघम अगेन फ्लॉप होण्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे.