पैशांअभावी वळली अभिनयाकडे!

आजकाल मोठेमोठे स्टार ओटीटीवर काम करण्यास उत्सुक असल्याचे दिसतात. कित्येक बॉलीवूड अभिनेत्री सुद्धा ओटीटीवर आपले नशीब आजमावत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? ओटीटीवर सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री कोण आहे?

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Tue, 12 Nov 2024
  • 04:28 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आजकाल मोठेमोठे स्टार ओटीटीवर काम करण्यास उत्सुक असल्याचे दिसतात. कित्येक बॉलीवूड अभिनेत्री सुद्धा ओटीटीवर आपले नशीब आजमावत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? ओटीटीवर सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री कोण आहे? तुम्हाला वाटत असेल की एखादी बॉलीवूड अभिनेत्री या यादीत टॉपला असेल. मात्र तसं नाहीये. कारण ओटीटीवर सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री ही दक्षिणेकडील अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही आहे. समंथा ही करोडोंची मालकीण आहे. एका शो साथी ती मोठी रक्कम घेत असल्याचे सांगितले जाते. 

समांथा रुथ प्रभूने आतापर्यंत 'मर्सल', 'महानती', 'यूटर्न', 'शाकुंतलम', 'यशोदा', 'खुशी' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतीच  वरुण धवणसोबत तिची'सिटाडेल: हनी बनी'ही वेब सिरिज रिलीज झाली आहे. 

मिडिया रिपोर्टस नुसार  समंथाने 'सिटाडेल: हनी बनी'साठी १० कोटी रुपये चार्ज केल्याची चर्चा आहे. जर ही गोष्ट खरी मानली तर समंथा ही   ओटीटीवर काम करण्यासाठी सर्वात जास्त चार्ज करणारी  अभिनेत्री बनली आहे. याआधी समंथाने मनोज वाजपेयीसोबत 'द फॅमिली मॅन २ 'मध्ये काम केले आहे. 

आज करोडोंची मालकीण असलेल्या समंथाची परिस्थिती नेहमीच अशी नव्हती. समंथाने एकदा बोलता बोलता सांगितले होते की पैसे नव्हते म्हणून तिला अभिनय क्षेत्रात यावे लागले. कॉफी विथ करण या शो मध्ये तिने सांगितले की, एक अशी वेळ होती जेव्हा तिच्याकडे शिक्षणासाठी पैसे नव्हते. कारण तिच्या वडिलांनी शिक्षणासाठी कर्ज घेऊन ते फेडण्यासाठी नकार दिला होता. एका परीने ते चांगलेच झाले. कारण त्यानंतर समंथा सिनेक्षेत्रात आली. आणि तिचे आयुष्य बदलून गेले. तिचे करियरसोबतच आता  तिची फॅन फॉलोविंग देखील मोठी आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story