उर्वशी नव्या घरात?
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नुकतीच कान्सवरून परत आली आहे. तेथील तिच्या लूकची चर्चा चाहते करत असतानाच आता ती तिच्या नवीन घरामुळेही चर्चेत आली आहे. मीडिया तील रिपोर्ट्सनुसार, उर्वशी आता दिवंगत चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या जुहू येथील बंगल्याजवळी शिफ्ट झाली आहे. यश चोप्रा यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पामेला चोप्रा येथे राहत होत्या. त्यांचे याच वर्षी २० एप्रिल रोजी निधन झाले.
एका वृतानुसार, उर्वशीने आधी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील 'सेलेस्ट' बंगल्याची निवड केली होती. हा बंगला तिच्या राहण्यासाठी तयारही करण्यात आला. मात्र, ती या घरात गेलीच नाही. उर्वशी बऱ्याच दिवसांपासून नवीन घराच्या शोधात होती. अखेर तिचा शोध संपला असून आता उर्वशी जुहूच्या बंगल्यात शिफ्ट झाली आहे. या बंगल्याचे आकर्षक असे इंटेरियर तयार करण्यात आले आहे. उर्वशीला या बंगल्यात शिफ्ट होऊन काही दिवस झाले आहेत. दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे.
उर्वशीचे हे आलिशान घर चार मजली आहे. बंगल्यात बाग आणि वैयक्तिक जिम आहे. याशिवाय उर्वशीच्या घराला एक मोठे अंगण आहे, ते यश चोप्रांच्या घरामागील अंगणाशी जोडलेले आहे. उर्वशीच्या या नवीन घराची किंमत तब्बल १९० कोटी असल्याचे संगण्ात येते. मात्र, उर्वशीने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. अलीकडेच उर्वशी १६ ते २७ मे दरम्यान झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती फ्रान्समध्ये हा सोहळा नेहमीप्रमाणे रंगला. कान्समधील आपल्या लूकने उर्वशी बरीच चर्चेत होती. मात्र दुसरीकडे तिच्या लूकमुळे ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. उर्वशीच्या लवकरच राम पोथिनेनीसोबत दिसणार आहे. तसेच, 'इन्स्पेक्टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डासोबत देखील ती असेल. उर्वशी थ्रिलर चित्रपट 'ब्लॅक रोज' मध्ये मध्यवर्ती भूमिके असणार आहे. तसेच साउथचा 'थिरुट्टू पायले २ ' च्या हिंदी रिमेकमध्ये देखील ती काम करणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.