योद्धा करताना राशी ला वाटली ही गोष्ट
आगामी ॲक्शनर " योद्धा " मध्ये नंतर चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी राशी खन्ना पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पॅन इंडिया स्टार राशी खन्ना हिने सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर चित्रपटाबद्दल आणि चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी तिला नवीन कलाकारासारखे का वाटले ? याबद्दल खुलासा केला आहे. हिंदी चित्रपटासाठी तिला इतका वेळ का लागला ? याबद्दल बोलताना तिने सांगितले की तिला अर्थपूर्ण स्क्रिप्ट हवी होती. अष्टपैलू पॉवरहाऊस असलेली राशी म्हणते " जर स्क्रिप्ट अर्थपूर्ण असेल तरच मला काम करावं असे वाटत. मला व्यक्तिरेखा आवडतात. त्यात येण्यासाठी माझ्यासाठी हे एक चांगलं पॅकेज असायला हवं आणि हा चित्रपट तसाच होता. मला तो चित्रपट पैसा वसुल करणार आहे असं वाटतं "
राशी या चित्रपटा बद्दल खूप उत्सुक असून या चित्रपटात "थ्रिलिंग एलिमेंट्स", आणि "रोमान्स" आहे आणि "सीट थ्रिलरची " एक मज्जा सुद्धा आहे असं तिला वाटतं.
योद्धा मध्ये राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत दिशा पटानी देखील मुख्य भूमिकेत आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित, 'योधा' 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.