इंडस्ट्रीत वाटेल त्यासाठी दबाव

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी हिने सिने इंडस्ट्रीतील तिचे अनुभव सांगितले आहेत. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना तिच्या शरीरात बदल करण्यासाठी इंडस्ट्रीकडून आलेल्या दबावाबद्दल तिने भाष्य केले. तिला अनेक प्रसंगी अनेक फिल्टर्स लावण्यास सांगितले गेले. पण या दबावाला न जुमानता आपण काम केले असे समीराने नमूद केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 11 Jun 2024
  • 02:41 pm
bollywood, sameera reddy

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) हिने सिने इंडस्ट्रीतील तिचे अनुभव सांगितले आहेत. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना तिच्या शरीरात बदल करण्यासाठी इंडस्ट्रीकडून आलेल्या दबावाबद्दल तिने भाष्य केले. तिला अनेक प्रसंगी अनेक फिल्टर्स लावण्यास सांगितले गेले. पण या दबावाला न जुमानता आपण काम केले असे समीराने नमूद केले.

एका मुलाखतीत समीरा म्हणाली, “माझ्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना मी सर्जरी करून माझे स्तन मोठे करून घ्यावे, यासाठी माझ्यावर किती दबाव टाकला गेला हे मी सांगू शकत नाही. बरेच लोक म्हणायचे, ‘समीरा, सगळे करत आहेत, मग तू का नाही?’ पण मला माझ्या आत असे काही नको होते. हे आपले असे दोष लपवण्यासारखे झाले जे मुळात दोष नाहीच. ज्यांना प्लास्टिक सर्जरी आणि बोटॉक्स करायचे आहे त्यांना मी नावे ठेवणार नाही, पण मी ते करणार नाही. समीरा बऱ्याचदा आपले वय जाहीरपणे सांगते आणि यासाठी चाहते तिचे कौतुकही करतात. गुगलने समीराचे वय चुकीचे दिले होते. पण तिने ते दुरुस्त करून घेतल्याचे सांगितले.

लोक म्हणतात की मी आता अधिक आनंदी आणि अधिक कंफर्टेबल दिसत आहे. मी २८ वर्षांची असताना सुंदर दिसत होते, पण ४५ व्या वर्षी एक कंफर्ट आला आहे. मी ४० वर्षांची असताना इंटरनेट माझे वय ३८ वर्षे दाखवत होते.  पण मला ४० वर्षांची असल्याचा अभिमान होता म्हणून मी लगेचच ते बदलून घेतले, असे समीरा म्हणाली.  सुरुवातीला समीरा जेव्हा सोशल मीडियावर आली, तेव्हा तिला अनेकांनी फिल्टर वापरण्याचा सल्ला दिला होता. “मी म्हणाले की मी माझी त्वचा खराब असेल तर मी ती तशीच दाखवेन, मी माझे वाढलेले वजन दाखवेन. कारण हीच मी आहे. ३६-२४-३६ या बॉडी साइजमध्ये फिट होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी मी जे केले,  त्याबद्दल जास्त आनंदी आहे. मी खऱ्या आयुष्यात जशी आहे, तशीच मी सोशल मीडियावर वावरले. चित्रपटांमध्ये काम करताना मी हे कधीच करू शकले नव्हते.

समीरा पुढे म्हणाली, “माझ्या आणि माझ्या प्रेक्षकांमध्ये नेहमीच एक पडदा होता. लोकांना जे ऐकायचे आहे तेच फक्त आम्ही मांडतो, परंतु तुम्ही झोपेतून उठता तेव्हा सुंदर आणि खूपच नीट दिसता हे दाखवल्याने आपण असे का दिसत नाही हा विचार करून इतरांना टेन्शन येऊ शकते. खरे तर तो फक्त दिखावा असतो. मी दररोज उठते तेव्हा फार चांगली दिसत असते असे नाही, मीही सकाळी उठल्यावर माझ्या मुलांच्या मागे धावत असते. ४५ वर्षांची झाल्यावरही माझ्याकडे चांगले दिसण्याची क्षमता आहे. तुमचे पांढरे केस, तुमची पोटाची चरबी आणि तुमचे स्ट्रेच मार्क्स दाखवता तेव्हा तिथल्या कोणाला तरी ‘माझ्यासारखेही दुसरे कोणीतरी आहे’ असे वाटते आणि यामुळे त्यांच्यावरील दबाव दूर होतो.”

Share this story