वुमन्स प्रीमियर लीग 2024 मध्ये दिसला #TheTigerEffect

WPL 2024 च्या उद्घाटन समारंभात दिसला #TheTigerEffect

TheTigerEffect

वुमन्स प्रीमियर लीग 2024 मध्ये दिसला

बॉलीवूडचा तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो इंडस्ट्रीतील सर्वात सुप्रसिद्ध  कलाकारांपैकी एक का आहे ! नुकत्याच झालेल्या वुमेन्स प्रीमियर लीग 2024 च्या उद्घाटन समारंभात टायगर ने त्याच्या दमदार परफॉर्मन्स ने प्रेक्षकांना मोहित केलं आहे. टायगर हा त्याच्या अभिनयाच्या सोबतीने उत्तम डान्सर म्हणून ओळखला जातो यात शंका नाही २०२४ मधल्या या खास इव्हेंट मध्ये त्याने धमाकेदार परफॉर्मन्स ने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.  डोळ्याचं पारणं फेडणारा हा कार्यक्रम आणि टायगर चा खिळवून ठेवणारा परफॉर्मन्स या कार्यक्रमाला चार चाँद लावून गेला आहे आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांनी #TheTigerEffect अनुभवला आहे. प्रेक्षकांचा लाडका युथ आयकॉन म्हणून त्याची असलेली अनोखी ओळख #TheTigerEffect प्रेक्षकांच्या हृदयाचा आणि मनाचा ताबा घेते.

ट्रेडमार्क आणि अफलातून स्टंट्सने टायगरने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो मनोरंजनाच्या जगात एक बेस्ट अभिनेता आहे. या खास इव्हेंटच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्याचा अनुभव सांगताना टायगरने WPL 2024 चे आयोजक आणि प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

टायगर व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि शाहिद कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनीही आपापल्या लोकप्रिय गाण्यांवर त्यांच्या परफॉर्मन्सने मंचावर लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सुपरस्टार शाहरुख खान ने केलं. 

टायगर त्याच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत असून ज्यामध्ये तो आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी ईदला रिलीज होणार आहे. सोबतीला टायगर लवकरच 'सिंघम अगेन' मध्येही ॲक्शन अवतारात दिसणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story