'सन मराठी' वाहिनीवरील 'मुलगी पसंत आहे' मालिकेच्या टीमची पुण्यात हवा
पुण्यात सध्या एका मालिकेचं जोरदार प्रमोशन सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री हर्षदा खानविलकर, कल्याणी टिभे, संग्राम समेळ ही कलाकार मंडळी त्यांच्या नव्या मालिकेच्या प्रमोशनसाठी पुणे दौरा करत आहेत. १५ जानेवारीपासून सन मराठी वाहिनीवर सुरु झालेली मुलगी पसंत आहे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे.
सध्या या मालिकेतील कलाकार मालिकेच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत मालिकेच्या प्रमोशनसाठी पुण्यात पोहोचले आहेत. यावेळी, समस्त पुणेकरांनीही या मालिकेला भरभरुन प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. भूतकाळात घडलेला वाईट गोष्टी माणसांच्या मनावर व त्याच्या हालचालीवर घर करून बसतात. आणि यालाच सूड असं म्हणतात. या सूडाचा बदला घेण्यासाठी एक बहिण आपल्या बहिणीसाठी नेमकं काय करु शकते हे या मुलगी पसंत आहे या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
'सन नेटवर्क'च्या 'सन मराठी' वाहिनीवरील मुलगी पसंत आहे ही मालिका दररोज सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येते. या मालिकेनिमित्त सन मराठी वाहिनी एक आगळा वेगळा विषय हाताळत एक अनोखी कथा घेऊन आली आहे. सासू-सूनेवर आधारित ही मालिका असून यांत हर्षदा खानविलकर सासूची भूमिका साकारत आहेत. तर कल्याणी टिभे सूनेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर संग्राम समेळ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेची कथा व पटकथा लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिली आहे. तर मृणालिनी जावळे यांनी संवादाची बाजू सांभाळली आहे. तर संगीताची जबाबदारी निलेश मोहरीर यांनी पेलली आहे. होम जरी सुनेच्या लग्नाचा पेटला असला तरी हवन सासूच्या गर्वाचा होणार. यशोधराची सून होऊन आराध्या उगवणार माहेरचा सूड, नेमकं काय घडणार हे जाणून घेण्यासाठी ‘मुलगी पसंत आहे’ ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता फक्त ‘सन मराठी’ वर नक्की पाहा.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.