तमन्ना-विजयची रोमंॅिटक केमिस्ट्री!
नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालत असलेल्या रॉम कॉम पठडीतील लस्ट स्टोरीज २ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. पुन्हा हा चित्रपट चार नवीन कथांसह पडद्यावर परत आला आहे. या टीझरमध्ये अनेक नायक-नायिका एकत्र आलेल्या दिसतात.
व्हीडीओची सुरुवात नीना गुप्ता हिच्या संवादाने होते. या वेळी ती म्हणते की, ज्याप्रमाणे कार घेण्यापूर्वी जशी आपण टेस्ट ड्राइव्ह घेतो तशीच टेस्ट ड्राइव्ह लग्नापूर्वी घ्यायला हवी. या चित्रपटात साऊथची सुपरस्टार तमन्ना आणि विजय वर्मा पाहायला मिळणार असून त्यांच्या रोमान्सच्या केमिस्ट्रीची आधीच चर्चा सुरू झालेली आहे. याच केमिस्ट्रीचे दर्शन चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या दोघांची रोमान्सची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. टीझरने त्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे यात शंका नाही. व्हीडीओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना एक नेटकरी म्हणतो की, तुमची कथा सर्व प्रेक्षकांना आवडेल अशी आमची इच्छा आहे. आणखी एक नेटकरी तमन्नाबद्दल म्हणतो की, तू आणि तमन्ना, 'ओह माय गॉड'. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. यामध्ये मृणाल ठाकूर, विजय वर्मा, काजोल, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, अमृता सुभाष, अंगद बेदी, कुमुद मिश्रा आणि तिलोत्तमा शोम आदी जानेमाने कलाकार आपल्या अभिनयाचे दर्शन चित्रपटातून घडवणार आहेत. या चित्रपटातील कथांचे दिग्दर्शन आर. बाल्की, कोंकणा सेन शर्मा, सुजॉय घोष आणि अमित शर्मा यांनी केलेले आहे. लस्ट स्टोरीज सीझन २ हा २९ जूनपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.