कॅटच्या अनारकलीची चर्चा
अर्पिता खान आणि आयुश शर्माच्या ईद पार्टीला बॉलिवूडच्या तारे-तारकांनी हजेरी लावली. या झगमगत्या आणि चमचमत्या तारकामंडलामुळे पार्टीची शोभा द्विगुणित झाली होती. या वेळी कॅटरिना कैफने ऊर्फ कॅटने घातलेल्या अनारकली ड्रेसचे साऱ्यांनी कौतुक केले. या अनारकली ड्रेसमध्ये कॅटरिनाच्या सौंदर्याने आणखी वेगळी झळाळी प्राप्त केली होती. अनारकली ड्रेस हा सर्वसाधारणपणे सणासुदीच्या काळात किंवा विवाहावेळी वापरला जातो. कॅटरिनाने वापरलेला पारंपरिक अनारकली ड्रेसचे डिझायनिंग हे तरुण ताहिलानीने केलेले होते. हा टू पीस चिकनकरी ड्रेस होता. त्याची किंमत फार नव्हती. केवळ ७ लाख ४९ हजार किंमत असलेला हा ड्रेस कॅटरिनाच्या सौंदर्याच्या मानाने काहीच नव्हता.
कॅटरिनाचा मॅक्सी लांबीचा अनारकली कुर्ता हा स्लिव्हलेस द्विस्तरीय होता. त्यावर केलेले नक्षीकाम त्याची शोभा वाढवत होते. त्याला दोन बॉर्डर आणि दुपट्टा होता. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हा ड्रेस चुडीदार आणि कुर्ता असा एकत्रित विक्रीला ठेवलेला आहे. हा ड्रेस सिल्क जॉर्जेटचा वापर करून अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे की, ज्यामुळे घालणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व आणखी खुलून दिसेल. कॅटरिनाने आपली सिग्नेचर हेअर स्टाईल केली होती. तिचा सॅटिन फिनिश मेकअप त्या वातावरणात आणखी दिमाखदार दिसत होता. एकूणच कॅटरिनाच्या सौंदर्याने आणि अनारकली ड्रेसने ईदच्या पार्टीची रौनक आणखी वाढवली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.