अनुराग ठाकूर यांनी घेतली पद्मजा फेणाणी यांची भेट
भारतीय संगीतविश्व हे किती समृद्ध आहे हे आपल्याला ठाऊक आहे, तसेच कलाविश्व आणि राजकारण यांच्यातील नातेसुद्धा आपल्याला ठाऊक आहेच. संगीतविश्वातील एक चतुरस्त्र गायिका म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या पद्मजा फेणाणी जोगळेकर या सध्या चर्चेत आहेत.
नुकतेच केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांची त्यांच्या मुंबईच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या. राजकीय विश्व आणि संगीतविश्वावर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान पद्मजा फेणाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. देशाला मोदींनी केवढ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे आणि जगभरात आज आपल्या देशाची कशी दखल घेतली जात आहे, याबद्दल सांगत पद्मजा फेणाणी यांनी पंतप्रधानांच्या कार्याची प्रशंसा केली.
इतकेच नव्हे, तर या वेळी पद्मजा यांनी त्यांच्या सुमधुर आवाजातील एक छानसे गीत गाऊन दाखवले. पद्मजा यांचे बऱ्याच राजकीय नेत्यांशी चांगले सलोख्याचे संबंध आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाच्या लग्नात तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. पद्मजा फेणाणी यांना त्यांच्या संगीत विश्वातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.