चौक चित्रपटाबाबत सुबोधची भावूक पोस्ट
गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘तेंडल्या’, ‘बलोच’ या चित्रपटानंतर आता लवकरच ‘चौक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. नुकतंच या चित्रपटाबद्दल अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर केली आहे.
सुबोध भावे हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. नुकतेच सुबोधने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने ‘चौक’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाबद्दल सांगितले आहे. त्याबरोबरच त्याने एक फोटोही शेअर केला.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये माझा प्रतिस्पर्धी असलेला दया गायकवाड दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला चित्रपट घेऊन येत आहे. आज महाराष्ट्रात तो प्रदर्शित होत आहे. आजपर्यंत उत्तम भूमिका त्याने अभिनेता म्हणून वठवल्या. मला खात्री आहे की, दिग्दर्शक म्हणूनसुद्धा त्याने उत्तम कामगिरी केली असेल. दया, दिग्दर्शक म्हणून तुझ्या या पहिल्या इनिंगसाठी तुला मनापासून शुभेच्छा. नक्की चित्रपट पाहा...”, असे सुबोध भावेने म्हटले आहे.
दरम्यान ‘चौक’ या चित्रपटात प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट १९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणांनी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर आता हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित झाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.