स्टाईल , फिटनेस आणि हास्य YouTube वर आयशा श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ मध्ये रंगला धमाल रॅपिड फायर
उद्योजक आणि स्टाईल आयकॉन कृष्णा श्रॉफ हिने अलीकडेच तिच्या YouTube चॅनेलवर तिच्या आई सोबत म्हणजे आयेशा श्रॉफ यांची मुलाखत घेतली. तिने तिची आई आयशा श्रॉफ हिच्यासोबत रॅपिड-फायर चा धमाल खेळ खेळला.
फिटनेस आणि चैतन्यशील व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाने तिच्या यूट्यूब चॅनलवर तिच्या आईला मजेदार, झटपट प्रश्न विचारले. या मुलाखतीत आई आणि मुलगी यांच्यातील आनंदी गप्पा अनुभवयाला मिळाल्या. कृष्णाच्या चॅनेलमध्ये फिटनेस वर भर असतो पण हा एपिसोड कमालीचा रंगला आहे. आयशा श्रॉफ, एक यशस्वी निर्माती आणि तिच्या मुलीसारखी फिटनेस उत्साही आहे हे यातून दिसून येत.
रॅपिड-फायर सेशन फक्त मजा करण्यापुरतेच नव्हते तर यातून चाहत्यांना कृष्णा आणि आयशा यांच्यातील अस्सल नातेसंबंध बघायला मिळाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.