श्रीदेवीची गर्ल्स पॉवर !

श्रीदेवी प्रसन्न ची नारी शक्ती !

Sridevi'sgirlspower!

श्रीदेवीची गर्ल्स पॉवर !

एखादा चित्रपट म्हंटला की भले मोठे कॅमेरे त्यामगाची टीम आपल्या डोळ्यासमोर येते पण सध्याचा जमाना तसा थोडा वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही. हल्ली अनेक चित्रपटाच्या सेटवर " नारी शक्ती " अनुभवयाला मिळते. सध्या सई ताम्हणकर तिच्या आगामी " श्रीदेवी प्रसन्न " या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये रमली आहे आणि तिने आज एक खास फोटो सोशल मीडिया वर शेयर केला.

तिच्या फोटो मधल्या या सगळ्या मुली नक्की कोण ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. सई या फोटो बद्दल सांगताना बोलते "आमच्या सेटवर सण होता आणि सगळे छान पारंपरिक लूक मध्ये आले होते एक आठवण म्हणून काढलेला हा फोटो तर आहे पण गंमत म्हणजे या फोटो मधल्या सगळ्या मुली तुम्हाला चित्रपटात एका सीन मध्ये बघायला सुद्धा मिळणार आहेत. या फोटो मधली प्रत्येक स्त्री या चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. डिरेक्शन डिपार्टमेंट , कॉस्ट्यूम डिपार्टमेंट हेड स्नेहा सोबतीला चित्रपटाची लेखिका अदिती मोघे आणि या चित्रपटाची ऑनलाईन एडिटर अश्या या मुलीची ही खास गोष्ट असलेला हा पॉवर गर्ल फोटो आहे"सई सांगते.

सईच्या या पॉवर गर्ल ची ही खास गोष्ट सेटवर असलेली स्त्री सक्षमीकरण दाखवून देते. चित्रपट कुठला ही असो इंडस्ट्रीत होणार हे स्त्री सक्षमीकरण नक्कीच उल्लेखनीय आहे यात शंका नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story