सोनाली सहगल अडकली विवाहबंधनात
'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहगलने तिचा दीर्घकाळपासूनचा प्रियकर असलेल्या आशिष सजनानीशी बुधवारी लग्न केले. त्या दोघांनी मुंबईतील गुरुद्वारात सात फेरे घेतले. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.
सोनालीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या साडीत आहे. साडीसोबतच सोनालीने डोक्यावर दुपट्टाही घेतला आहे. तसेच, आशिषनेही मॅचिंग आउटफिट्स परिधान केले होते.
सोनाली सहगलच्या लग्नाला इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. मंदिरा बेदी, रिद्धिमा पंडित, चाहत खन्ना, सुमोना चक्रवर्ती आणि टीव्ही अभिनेता करण व्ही ग्रोव्हर आदी पत्नीसोबत पोहोचले होते. याशिवाय कार्तिक आर्यननेही सोनालीच्या लग्नाला हजेरी लावली.
सोनाली गेल्या पाच वर्षांपासून आशिष सजनानीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, त्यांनी हे गुपित ठेवले. खरे तर, सोनालीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना कळावे असे वाटत नव्हते. आशिष एक उद्योजक बिझनेसमन आहे आणि त्याचे मुंबईत अनेक हॉटेल्स आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघे ८ जून रोजी मुंबईतच एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत.
सोनालीने तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या लग्नसोहळ्यात सोनालीने गुलाबी रंगाचा घागरा परिधान केला होता, तर आशीषने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती. हे फोटो बघताच तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, काही जणांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे की, “ही सगळी त्याच्याकडे असणाऱ्या पैशांची कमाल आहे.” तर दुसरा यूजर म्हणाला, “हे कोण काका बसले आहेत तिच्या बाजूला?” तर तिसरा म्हणाला, “हा तिचा नवरा कमी आणि वडीलच जास्त वाटतो आहे.” तर आणखी एकाने लिहिले आहे की, “याला पाहून मला वाटले की, हिचे वडील कन्यादान करायला आले आहेत.” तर आणखी एक जण म्हणाला, “हे चांगलं आहे.. आधी तरुण मुलांना डेट करायचे आणि मग वयस्कर व्यक्तीशी लग्न करून भविष्य सुरक्षित करायचे.” आता या फोटोंमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.