आई आणि मुलाचे नाते फुलवणारा चित्रपट 'श्यामची आई'
अमृता अरुण राव निर्मित 'श्यामची आई' या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय डहाके यांनी केले. कृष्णधवल पटातील अनोखा अंदाज असलेला हा चित्रपट १० नोव्हेंबरला चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या भेटीस आला.
या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर 'श्यामची आई' चित्रपटातील कलाकारांनी 'सीविक मिरर'च्या ऑफिसला भेट देऊन चित्रपटाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या.यावेळी स्टारकास्ट ओम भूतकर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक. दिग्दर्शक सुजय डहाके उपस्थित होते.
चित्रपटाचा लूक ते कथा, संवाद, सादरीकरण याबाबतीत अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी वरती दिग्दर्शक सुजय डहाकेने अत्यंत बारकाईने काम केले आहे. 'श्यामची आई' या चित्रपटात ओम भूतकर यांनी प्रौढ साने गुरुजींची भूमिका साकारली आहे. मुळशी पॅटर्न मध्ये राहूल्याच्या भूमिकेत पाहिलेला अँग्री यंग मॅन ओम भूतकरने या चित्रपटात शांत, मितभाषी साने गुरुजी संयतपणे साकारले आहेत. ओमने सागुरुजींच्या भाषेचा पकडलेला लहेजा त्या काळातल्या गोष्टी जश्यातश्या डोल्यासोमोर उभा करतो.
तर सोबत गौरी देशपांडे ही गौरी देशपांडेने आईच्या भूमिकेत जबरदस्त अभिनय केलाय. गौरीचा हा पहिला सिनेमा आहे. पहिल्याच सिनेमात गौरीने अत्यंत सुंदर काम केलंय. आईचा धाक, लेकरांसाठीची धडपड, कुटुंबासाठी तळमळ, हलाखीत जगुनही जपलेला स्वाभिमान अशा अनेक भावना गौरीने प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेत...
संदीप पाठक यांनी श्यामच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. ही भूमिका करणार हाच त्यांचा आयडियल रोल होता असं त्यांनी यावेळी सांगितलं. मी खूप नशीबवान आहे की मला सुजय ने हा रोल दिला असे देखील ते यावेळी म्हणाले.
छोटा श्याम झालेला बालकलाकार शर्व गाडगीळने गोड अभिनय केलाय. हा रोल निभावताना तू रिटेक घेतलेस का हा प्रश्न विचारल्यावरती गोड हसत शर्म मनाला परफेक्ट काम स्क्रीन वरती दिसत नव्हतं तोपर्यंत सुजय दादा ने माझ्याकडून ते रिटेक मध्ये करून घेतलं.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.