संग्रहित छायाचित्र
आजपर्यंत अशी कोणतीही अभिनेत्री दिसली नाही जी मीना कुमारीची जागा घेऊ शकेल, जिच्याकडे अभिनयाचे कौशल्य असेल, जी पडद्यावर येऊन चमकेल आणि ट्रॅजिक सीन्समधून तिच्यासोबत प्रेक्षकांनाही रडवू शकेल. मोठ्या पडद्यावर भलेही नाही पण ओटीटीच्या दुनियेत दु:खात बुडणारी आणि प्रेक्षकांनाही बुडायला भाग पाडणारी अभिनेत्री नक्कीच आहे. अभिनयाच्या या कौशल्यामुळे या अभिनेत्रीला ट्रॅजेडी क्वीन म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ही अभिनेत्री आहे श्वेता त्रिपाठी.
श्वेता त्रिपाठीचे नाव आजच्या सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रींमध्ये सामील आहे. तिच्या चेहऱ्यावर नाजुकपणा आणि सोज्वळता दोन्ही दिसते. तिचा अभिनय इतका चांगला आहे की तिची प्रत्येक भुमिका प्रेक्षकांना भावते. श्वेता त्रिपाठीच्या करिअरची सुरुवात मसान या चित्रपटातून झाली. या चित्रपटातील शालू गुप्ताच्या भुमिकेसाठी तिली सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा झी सीने पुरस्कारही मिळाला. यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हरामखोर या चित्रपटात ती मुख्य भुमिकेत दिसली. यानंतर ती चित्रपटसृष्टीत तर सक्रिय होतीच पण तिने ओटीटीच्या दुनियेतही पदार्पण केले. इथे तिच्या प्रत्येक भुमिकेसाठी तिचे कौतुक झाले. श्वेता त्रिपाठीच्या बहुतांश भुमिका दुःखद होत्या हा देखील योगायोग आहे. त्यामुळे तिला ओटीटीची मीना कुमारी म्हणता येईल.
काली काली आंखे फेम श्वेता त्रिपाठी तिला मिळालेल्या मीना कुमारीच्या टॅगमुळे खुप खुश आहे. मात्र तिला अभिनय़ाच्या दुनियेत वेगवेगळ्या भुमिका साकारायच्या आहे. एनडीटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, प्रेक्षकांसमोर अभिनयाचा अजुन एक पैलू मांडण्यासाठी तिने भविष्यामध्ये विनोदी भुमिकेतही दिसण्याच्या योजना आखलेल्या आहेत.