...तर लग्न व्यर्थ

जावेद अख्तर यांनी नुकतेच शबाना आझमीसोबतच्या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले. यावेळी त्यांनी लग्नाबाबत आपले मत मांडले. ते म्हणाले, मी लग्नाचा फारसा विचार करत नाही, माझ्या दृष्टीने लग्नामुळे फारसा फरक पडत नाही.

संग्रहित छायाचित्र

जावेद अख्तर यांनी नुकतेच शबाना आझमीसोबतच्या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले. यावेळी त्यांनी लग्नाबाबत आपले मत मांडले. ते म्हणाले, मी लग्नाचा फारसा विचार करत नाही, माझ्या दृष्टीने लग्नामुळे फारसा फरक पडत नाही. या संभाषणात जावेद यांनी सांगितले की, ‘‘नात्यात परस्पर समंजसपणा आणि एकमेकांचा आदर करणे हे लग्नापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. जर तुम्ही एकमेकांना समजून घेत नसाल तर लग्न हे व्यर्थ आहे.’’

एका मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, ‘‘लग्न हे एक निरुपयोगी काम आहे. ही एक जुनी परंपरा आहे, लग्न हा शतकानुशतके डोंगरातून लोळलेला दगड आहे. आणि टेकडीवरून खाली येत असल्याने त्यावर शेवाळ, कचरा आणि घाण साचली आहे. दोन माणसे आनंदाने एकत्र कशी राहू शकतात? एकत्र राहण्यासाठी एकमेकांचा आदर, परस्पर विचार आणि एकमेकांना स्पेस देणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.’’

जावेद म्हणाले की प्रत्येकजण, अगदी आपला जोडीदारदेखील एक व्यक्ती आहे, हे मजून घेणे महत्वाचे आहे. त्याचे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य आहे, त्याची विचारसरणी आपल्यापेक्षा वेगळी असू शकते, त्याची काही स्वप्ने असू शकतात. लग्न हे रॉकेट सायन्स नाही. जर तुम्ही आनंदी असाल तर लग्न हे खूप सोपे काम आहे. लग्न ही फक्त एक परंपरा आहे. लग्न म्हणजे फक्त नवरा-बायकोचा टॅग लावणे असा होत नाही. आपण आपल्या जोडीदारासोबत मित्रासारखे जगले पाहिजे आणि एकमेकांचा आदर केला पाहिजे. पती-पत्नी होण्यापूर्वी शबाना आणि मी एकमेकांचे चांगले मित्र होतो, असेही जावेद यांनी यावेळी सांगितले.

जावेद अख्तर म्हणाले की, ‘‘स्वतंत्र महिलांना गुलाम बनवता येणार नाही. कारण एक स्वतंत्र स्त्री स्वतःचे विचार, कल्पना, इच्छा, स्वप्ने सोबत घेऊन येते. म्हणूनच तिला कधीही तुमची गुलाम व्हायचे नाही. जोडीदाराला हे सर्व समजून घेणे आवश्यक आहे, तरच नाते आणि विवाह योग्य चालण्यास सक्षम होईल.’’

जावेद यांनी अनेकदा शबानाशी लग्न करताना पहिली पत्नी हनी इराणीला खूप वेदना दिल्याचा अपराधभाव व्यक्त केला आहे. अलीकडेच प्राइम व्हिडीओवर ‘अँग्री यंग मेन’ ही डॉक्युमेंट्री सिरीज रिलीज झाली. ही मालिका जावेद आणि सलीम खान यांच्या जीवनावर आधारित आहे. यात ते म्हणतात, ‘‘हनी ही जगातली एक अशी व्यक्ती आहे, जिच्यासाठी मला अपराधी वाटतं.  मला आज जितकी समज आहे, तितकी त्यावेळीअसती तर कदाचित गोष्टी इतक्या चुकीच्या झाल्या नसत्या.’’

जावेद  यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हनी इराणी आहे. दोघांनी १९७२ मध्ये लग्न केले. जावेद आणि हनी इराणी यांना फरहान आणि झोया ही दोन मुले आहेत. १९८५ मध्ये जावेद आणि हनी यांचा घटस्फोट झाला. मात्र, याच्या एक वर्ष आधी १९८४ मध्ये जावेद  यांनी शबानासोबत लग्न केले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story