अफेअरचा इन्कार

नीलम कोठारी आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. या दोघांनी पहिल्यांदा इल्जाम या चित्रपटात काम केले होते. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. यानंतर दोघांनी आपल्या करिअरमध्ये १४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

संग्रहित छायाचित्र

नीलम कोठारी आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. या दोघांनी पहिल्यांदा इल्जाम या चित्रपटात काम केले होते. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. यानंतर दोघांनी आपल्या करिअरमध्ये १४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. नीलम आणि गोविंदाची जोडी इतकी आवडली की त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. नीलमने मात्र त्यांचे अफेअर असल्याचे नाकारले.

 अशीही अफवा पसरली होती की गोविंदाने नीलमला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. नुकतीच नीलमने गोविंदासोबतच्या अफेअरबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, ‘‘गोविंदा आणि माझे अफेअर नव्हते. लिंकअप्स हा संपूर्ण खेळाचा एक भाग आहे, त्या वेळी लोकांनी त्यांना जे काही प्रकाशित करायचे ते प्रकाशित केले आणि त्या अफवांवर स्पष्टीकरण देण्यासाठी कोणीही नव्हते. कारण त्यावेळी आम्हाला प्रेसची भीती वाटत होती. त्या वेळी, आपण एखाद्याबरोबर दोन-तीनपेक्षा जास्त चित्रपट केले कीडेटिंगच्या अफवा उडू लागायच्या. गोविंदासोबत तर मी अनेक चित्रपट केले.’’

 नीलमने २०११ मध्ये अभिनेता समीर सोनीसोबत लग्न केले होते. गोविंदाने १९०० मध्ये स्टारडस्टसोबतच्या संभाषणात नीलमच्या प्रेमात असल्याचे सांगितले होते. ‘‘मी नीलमचे कौतुक करणे थांबवू शकलो नाही. तुमच्या मित्रांकडून, तुमच्या कुटुंबाकडून. अगदी सुनीताकडून. मी सुनीताला स्वतःला बदलून नीलमसारखं व्हायला सांगायचो. सुनीता आणि माझे भांडण झाले, भांडणानंतर मी सुनीतासोबतचे नाते संपवण्यास तयार झालो. मी सुनीताला मला सोडायला सांगितले, मी तिच्याशी सगाई तोडली होती. आणि जर सुनीताने मला पाच दिवसांनी फोन करून पुन्हा लग्न करायला पटवले नसते तर कदाचित मी नीलमशी लग्न केले असते,’’असे त्यावेळी गोविंदा म्हणाला होता.

नीलम शेवटची २००१ मध्ये ‘कसम’ चित्रपटात दिसली होती. अलीकडेच नीलमचा शो Fabulous Lives of Bollywood Wives चा तिसरा सीझन रिलीज झाला आहे. शोमध्ये नीलमसोबत रिद्धिमा कपूर साहिनी, सीमा सजदेह, महीप कपूर, भावना पांडे, शालिनी पासी आणि कल्याणी साहा चावला यांच्या भूमिका आहेत. गोविंदाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तो गेल्या पाच वर्षांपासून फिल्मी जगापासून दूर आहे. बऱ्याच दिवसांपासून तो कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही. मात्र, तो अनेक रिॲलिटी शोमध्येही दिसत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story