रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा लंच डेटवर

रूमर्ड कपल रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा लंच डेटवर एकत्र दिसले. दोघांचेही एकत्र फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. फोटोत विजय टेबलवर बसून जेवत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 25 Nov 2024
  • 01:57 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

रूमर्ड कपल रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा लंच डेटवर एकत्र दिसले. दोघांचेही एकत्र फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.   फोटोत विजय टेबलवर बसून जेवत आहे. रश्मिका त्याच्या समोर कॅमेऱ्याकडे पाठ करून बसलेली दिसली. दुसऱ्या फोटोत रश्मिका तिच्या जेवणाचा आस्वाद घेताना दिसली.

यावेळी दोघेही ट्विनिंग करताना दिसले. रश्मिका स्लीव्हलेस क्रॉप ब्लू टॉप आणि ब्लू डेनिममध्ये दिसली होती. विजय निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसला. काही दिवसांपूर्वी रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारले असता विजय म्हणाला होता, ‘‘मी सिंगल नाही.’’

 अनेक दिवसांपासून विजय आणि रश्मिका रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत होत्या. अलीकडेच, कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत विजयने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. तो म्हणाला होता, ‘‘मला माहित आहे प्रेम म्हणजे काय. मी यापूर्वी को-स्टारला डेट केले आहे. मी ३५ वर्षांचा आहे, मी अविवाहित राहीन असे तुम्हाला वाटते का? आपल्या सर्वांना कधी ना कधी लग्न करावेच लागते, जोपर्यंत तसे न करण्याचा पर्याय नाही.’’

रश्मिका आणि विजय यांनी २०१८ मध्ये आलेल्या 'गीता गोविंदम' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. यानंतर २०१९ च्या 'डियर कॉमरेड'मध्येही त्यांची ऑन-स्क्रीन जोडी चांगलीच आवडली होती. या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यानच त्यांच्या डेटींगच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, त्यांनी याचा इन्कार केला.

विजयसोबतच्या तिच्या बाँडिंगबद्दल रश्मिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘‘रक्षितसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जेव्हा मी नाराज होते, तेव्हा विजयनेच मला त्यावर मात करण्यास मदत केली. त्या काळात त्याने माझी काळजी घेतली आणि माझ्या भावना समजून घेतल्या.’’ २०२४ च्या सुरुवातीला विजय आणि रश्मिका लग्नाच्या तयारीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण या दोघांनी त्यावर कधीच अधिकृत भाष्य केले नाही.

 रश्मिकाने को-स्टार रक्षित शेट्टीला डेट करायला सुरुवात केली होती. एक वर्ष डेट केल्यानंतर २०१७ मध्ये  दोघांनी एंगेजमेंट केली. मात्र लग्न होण्यापूर्वीचइ सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांची एंगेजमेंट तुटली. ब्रेकअपनंतर मीडियात रश्मिकाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.  प्रकरण वाढत चाललेले पाहून रक्षितने या संपूर्ण प्रकरणावर आपले मौन तोडले आणि म्हणाला ‘‘तुम्ही सर्वांनी रश्मिकाबद्दल आपले मत बनवले आहे, परंतु मी तिला अडीच वर्षांपासून ओळखतो. कृपया तुम्ही सर्वांनी तिला जज करणे थांबवा.  ब्रेकअपनंतरही तो आणि रश्मिका संपर्कात आहेत. आम्ही सतत संपर्कात राहत नाही, पण जेव्हाही माझा चित्रपट प्रदर्शित होतो किंवा माझा वाढदिवस असतो, तेव्हा रश्मिका मला नक्कीच शुभेच्छा देते आणि मी रश्मिकाला शुभेच्छा देतो.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story